शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

शाहीन बाग: इसिसचा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; काश्मीरी दाम्पत्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 10:51 IST

दिल्ली पोलिसांनुसार पकडला गेलेला दहशतवादी जहांबेज सामी आणि त्याची पत्नी हिना बशीर बेग हे दोघेही सोशल मिडीयावर कमालीचे सक्रीय आहेत.

नवी दिल्ली : सीएए विरोधात सुरू असलेल्या दिल्लीतील शाहीन बागमधील आंदोलकांना भडकविण्यासाठी इसिसची टीम कार्यरत झाली होती. शाहीन बाग पेटल्यानंतर काश्मीरी दांम्पत्याने दिल्लीत मोठा दहशतवादी हल्ला घडविण्याची तयारीही केली होती. मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि स्फोटके जमिवण्याचे काम सुरू होते. मात्र, पोलिसांनी आधीच छापा टाकल्याने मोठा हिंसाचार टळला आहे. 

दिल्ली पोलिसांनुसार पकडला गेलेला दहशतवादी जहांबेज सामी आणि त्याची पत्नी हिना बशीर बेग हे दोघेही सोशल मिडीयावर कमालीचे सक्रीय आहेत. दोघांचीही अनेक प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या नावाने खाती आहेत. या खात्यांद्वारे भारतीय मुसलमानांना एकजूट करून आणि सरकारविरोधात सीएएवरून आंदोलन भडकविण्याचे काम सुरू होते. 

सामीच्या सायबरस्पेसमध्ये संशयस्पद हालचाली पाहून स्पेशल सेलने त्याच्यावर मागिल महिनाभरापासून नजर ठेवली होती. याशिवाय आयबीनेही दोघांच्याबाबतीत गुप्त माहिती दिली होती. चौकशीमध्ये सामीने सांगितले की, मुस्लिम बहुल भागात जाऊन लोकांना भडकविण्याचे काम करत होतो. 

आयएसकेपीने त्यांच्यावर मुस्लिम तरुणांना संघटनेमध्ये भरती करण्याची जबाबदारी दिली होती. त्यांना याद्वारे मोठ्या दहशतवादी हल्ल्याला यशस्वी करायचे होते. सामी शाहीन बाग आणि दिल्लीतील अन्य ठिकाणी जाऊन त्यांना हे भारत सरकार हटवायचे असल्याचे सांगत होता. 

इसिसशी संबंध सामीने त्याच्या पत्नीची इसिस समर्थक सोशल मिडीयावर तीन चार अकाऊंट असल्याचे सांगितले. हिना ही सोशल मिडीयावर दहशतवादी विचाराच्या तरुणांना शोधून त्यांच्याशी संपर्क साधण्याचे काम करत होती. तसेच त्यांना दहशतवादाशी जोडण्यासाठी मध्यस्थाची भुमिकाही पार पाडत होती. 

एक सहकारी तिहारमध्ये सामीचा एक सहकारी तिहार जेलमध्ये असून त्याच्यावर खटला दाखल आहे. इसिसमध्ये अनेक भारतीय तरुण असून काही वर्षांपासून हे दहशतवादी अफगाणिस्तानच्या खोरासन या प्रांतामध्ये राहत आहेत. ते या दोघांच्याही संपर्कात असतात असेही पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादISISइसिस