शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
3
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
4
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
5
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
6
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
7
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
8
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
9
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
10
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
11
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
12
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
13
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
14
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
15
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
16
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
17
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
18
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
19
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
20
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन

मनोरुग्ण तरुणीवर कारमध्ये अत्याचार; विवस्त्रवस्थेत आढळून आली पीडित तरुणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 2:58 PM

याप्रकरणी माउली सेवा प्रतिष्ठानच्या संचालिका डॉ. सुचेता राजेंद्र धामणे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि़२१) फिर्याद दिली़ यावरुन अभय बाबूराव कडू (वय ५८, रा. आनंदनगर सिंहगड रोड, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे या घटनेतील २७ वर्षीय पीडित तरुणी स्वभावाने भोळसर असल्याने ती औरंगाबाद शहरात एकटीच राहत होती. पीडित तरूणीवर आरोपी अभय कडू याने अत्याचार केल्यानंतर ती कारमधून पळून गेली होती.

अहमदनगर : तरुणीच्या भोळसर स्वभावाचा गैरफायदा घेत तिच्यावर आरोपीने कारमध्ये अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नगर शहरातील पुणे रोडवरील रेल्वे उड्डाणपूल परिसरात सोमवारी (दि़२०) पहाटे ही घटना घडली. याप्रकरणी माउली सेवा प्रतिष्ठानच्या संचालिका डॉ. सुचेता राजेंद्र धामणे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि़२१) फिर्याद दिली़ यावरुन अभय बाबूराव कडू (वय ५८, रा. आनंदनगर सिंहगड रोड, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.या घटनेतील २७ वर्षीय पीडित तरुणी स्वभावाने भोळसर असल्याने ती औरंगाबाद शहरात एकटीच राहत होती. आरोपी अभय कडू हा महिनाभरापूर्वी औरंगाबाद येथे गेला तेव्हा ही तरुणी त्याच्या निदर्शनास आली. तो तिला कारमधून पुणे येथे घेऊन गेला. आरोपीने एक महिना त्या तरुणीला त्याच्याजवळ ठेवून तिच्यावर अत्याचार केला. सोमवारी रात्री अभय कडू त्या तरुणीला घेऊन औरंगाबाद येथे निघाला होता. पहाटेच्या सुमारास कार नगर-पुणे रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ आली. यावेळी कडू याने कार रस्त्याच्या बाजूला घेऊन तरुणीला विवस्त्र करून तिच्यावर अत्याचार केला. या प्रसंगाने घाबरून गेलेली ही तरुणी विवस्त्र अवस्थेत कारमधून बाहेर पळाली. सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास काही नागरिकांना ही पीडित तरूणी शहरातील चांदणी चौक परिसरात विवस्त्र अवस्थेत रस्त्यावरून पळताना आढळून आली.याबाबत माउली सेवा प्रतिष्ठानचे डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सुचेता धामणे यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर डॉ. धामणे यांनी पोलिसांच्या मदतीने या तरुणीस शिंगवे नाईक येथील माउली प्रतिष्ठानमध्ये नेले. तेथे तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मंगळवारी सकाळी तिची प्रकृती सुधारल्यानंतर घडलेली घटना तिने डॉक्टर सुचेता धामणे यांना सांगितली. तिची मानसिक स्थिती सामान्य नसल्याने डॉ़ धामणे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.पीडित तरूणीवर आरोपी अभय कडू याने अत्याचार केल्यानंतर ती कारमधून पळून गेली होती. हे प्रकरण अंगावर येऊ नये म्हणून सोमवारी सकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात येऊन कडू याने ही तरुणी मनोरुग्ण असून ती माझ्या मित्राची मुलगी आहे व ती हरवली आहे, अशा स्वरूपाची तक्रार दिली होती. मात्र, पीडित तरुणीने डॉक्टर धामणे यांना सत्य परिस्थिती सांगितल्यानंतर आरोपीचा भांडाफोड झाला. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक किरण सुरसे व पोलीस पथकाने आरोपीला तत्काळ अटक केली़.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मेट्रो सिटीत IS ची कमान महिलांच्या हाती; NIAचा मोठा खुलासा

 

Vikas Dubey Encounter : कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला समोर, झाला मोठा खुलासा

 

दहा रुपये, समोसा अन् घडली भयावह घटना; शाळकरी मुलाने गळफास लावून केली आत्महत्या 

 

वेदनादायी! शेतात घुसली म्हणून सांडणीचे कुऱ्हाडीनं कापले पाय; तडफडत सोडला जीव

 

वकिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देऊ शकत नाही, राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

 

...अन् फेसबुक फ्रेंडनं महिलेला घातला थोडा थोडका नव्हे, तर ११ लाखांचा गंडा

टॅग्स :Rapeबलात्कारAhmednagarअहमदनगरPoliceपोलिसArrestअटक