अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; युवकावर नोंदविला गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 22:38 IST2021-01-04T22:37:24+5:302021-01-04T22:38:05+5:30
Pocso Act : भातकुली ठाण्याच्या हद्दीतील घटना

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; युवकावर नोंदविला गुन्हा
अमरावती : घराजवळील अंगणात मोबाईल बघत असलेल्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून तिला जबरदस्तीने गोठ्यात नेले व तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना भातकुली ठाण्याच्या हद्दीतील एका गावात रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली.
याप्रकरणी मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर सोमवारी २१ वर्षीय आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३७६(२) (आय), सहकलम ४,६, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ नुसार गुन्हा नोंदविला व अटक करण्यात आली. त्याला ८ जानेवारीपर्यंत कोठडी मिळाली असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास भातकुली पोलीस करीत आहेत.