शहरं
Join us  
Trending Stories
1
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
2
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
3
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
4
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
5
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
8
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
9
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
10
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
11
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
12
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
13
IND vs SA T20I : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हममधून जसप्रीत बुमराह OUT; कारण...
14
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
15
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
16
पीएम सूर्य घर : मोफत वीज योजनेसाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज? सोपी आहे पद्धत, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
17
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
18
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
19
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
Daily Top 2Weekly Top 5

UN च्या कारमध्ये भररस्त्यात सेक्स; व्हिडीओ व्हायरल झाल्यावर संयुक्त राष्ट्राने दिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 16:20 IST

कारमधील सेक्स दोन लोकांच्या संमतीने केले गेले होते किंवा त्यासाठी पैसे दिले गेले होते, याचा गांभीर्याने तपास केला जात आहे.

ठळक मुद्देवाहतूक सिग्नलवर वाहन थांबल्यानंतर कोणीतरी हा व्हिडिओ इमारतीच्या वरून काढला. संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस एंटोनियो गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टीफन डुजारिक म्हणाले की, १८ सेकंदाचा हा व्हिडिओ घृणास्पद आहे. आम्ही या कृत्याच्या विरोधात आहोत. अशी प्रकरणे यूएनच्या कर्मचार्‍यांद्वारे समोर आली आहेत.

युनायटेड नेशन्सच्या अधिकाऱ्याने एका महिलेसह कारमध्ये शारीरिक संबंध ठेवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. इजयारलची राजधानी तेल अवीव येथून हा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी सांगितले की, ही घटना अत्यंत धक्कादायक आणि त्रासदायक आहे.व्हायरल क्लिपमध्ये हे स्पष्ट झाले आहे की, लाल पोशाख घातलेली एक महिला एका पुरुषासह कारच्या मागील सीटवर बसली आहे. या व्यतिरिक्त कारमध्ये ड्रायव्हिंग सीटवर एक व्यक्ती देखील दिसत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर, युएनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. व्हिडिओमध्ये दिसणार्‍या व्यक्तीची ओळख पटविण्यात ते जवळ पोहचले आहेत. यूएनकडून सांगण्यात आले की, इजयारलमधील शांतता संघटनेच्या कर्मचार्‍यांवरही संशय व्यक्त केला जात आहे. व्हिडिओ तेल अवीवमधील मुख्य रस्त्यावरचा आहे. यापूर्वी व्हिडिओमध्ये ड्रायव्हरचा चेहरा स्पष्ट दिसत होता, गाडी तेथून निघून गेली. वाहतूक सिग्नलवर वाहन थांबल्यानंतर कोणीतरी हा व्हिडिओ इमारतीच्या वरून काढला.संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस एंटोनियो गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टीफन डुजारिक म्हणाले की, १८ सेकंदाचा हा व्हिडिओ घृणास्पद आहे. आम्ही या कृत्याच्या विरोधात आहोत. अशी प्रकरणे यूएनच्या कर्मचार्‍यांद्वारे समोर आली आहेत. पुढे ते म्हणाले, "ही कार 'युनायटेड नेशन्स ट्रस सुपरव्हिझन ऑर्गनायझेशन'ची असल्याचे आतापर्यंत उघड झालेल्या माहितीवरून समजले आहे. कारमधील सेक्स दोन लोकांच्या संमतीने केले गेले होते किंवा त्यासाठी पैसे दिले गेले होते, याचा गांभीर्याने तपास केला जात आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

५ प्रेमविवाहानंतर पतीचा दुर्दैवी अंत; पहिल्या पत्नीनेच १ कोटींची सुपारी देऊन काढला काटा

 

लग्न सोहळ्यात वादग्रस्त हळदी समारंभामुळे आले विघ्न, तिघांवर गुन्हा दाखल

 

हृदयद्रावक! बंद फ्लॅटमध्ये दाम्पत्याची आत्महत्या; पोलिसांनी दरवाजा उघडताच ८ महिन्यांचे बाळ दिसले रांगताना 

 

बापरे! आई आणि  मुलाच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून सावत्र बापाने केली मुलाची हत्या

 

भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

 

नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न

 

 

Coronavirus News : कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन केलेल्या युवकाची आत्महत्या

डुजारीक म्हणाले, 'या व्हिडिओशी संबंधित घटनेचे ठिकाण ओळखले गेले आहे. व्हिडिओमध्ये दिसली ती जागा हायारर्कोन रोडची आहे. सहसा या ठिकाणी खूप गर्दी असते. चौकशीत आरोपीची ओळख लवकरच उघडकीस येईल. लैंगिक अत्याचार व अत्याचारांबाबतचे संयुक्त राष्ट्रांचे धोरण अत्यंत कठोर आहे. नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल संबंधित व्यक्ती दोषी आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते. या प्रकरणात, शांतता संघटना दोषींवर बंदी घालू शकते आणि त्याला घरी परत पाठवू शकते. 

संयुक्त राष्ट्र संघ बराच काळ त्याच्या शांतता प्रस्थापितांनी आणि इतर कर्मचार्‍यांद्वारे लैंगिक गैरवर्तन केल्याच्या आरोपाची चौकशी करत आहे. गेल्या काही वर्षांत अशी प्रकरणे सातत्याने पुढे येत आहेत. तर स्वत: यूएनचे सरचिटणीस गुटेरेस यांनी लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात सामील असलेल्या वरिष्ठ अधिका-यांसाठी शून्य सहिष्णुता (झिरो टॉलरेंस) असल्याचे सांगितले आहे.ह्यूमन राइट्स वॉचचे सह-संचालक हेदर बार यांनी सांगितले की, इजयारलमधून व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून तिला अजिबात आश्चर्य वाटले नाही. ते म्हणाले, 'हे चांगले आहे की यूएन या प्रकरणाची चौकशी करत आहे, परंतु या व्हिडिओशिवाय बर्‍याच मोठ्या समस्या आहेत.' या समस्या संयुक्त राष्ट्रांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लैंगिक शोषण आणि अत्याचारांच्या आरोपाशी जोडल्या आहेत. म्हणून, अशा बाबींवर फारसा धक्का बसण्याची गरज नाही.एका अहवालानुसार, सन २०१९ मध्ये, लैंगिक शोषण आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या कर्मचार्‍यांच्या गैरवर्तनाशी संबंधित १७५ प्रकरणे दाखल केली गेली आहेत. त्यापैकी केवळ १६ जणांवरील आरोप सिद्ध झाले, तर १५ प्रकरणात आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली. इतर सर्व प्रकरणांत अद्याप चौकशी चालू आहे.

 

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाUnited Statesअमेरिकाcarकार