नांदेड सिटीतील मॉलमध्ये सेक्स रॅकेट उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 15:37 IST2019-08-19T15:36:57+5:302019-08-19T15:37:30+5:30
नांदेड सिटीतील मॉलमध्ये ऑर्चिड फाईड स्प्पा नावाचे मसाज सेंटर सुरु असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती.

नांदेड सिटीतील मॉलमध्ये सेक्स रॅकेट उघडकीस
पुणे : मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असणारे हायप्रोफाईल सेक्स रॅकेट स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) उघडकीस आणले आहे. या मसाज सेंटरमधून थायलंडच्या पाच युवती आणि व्यवस्थापक यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची तपासणी सुरु आहे.
एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. नांदेड सिटीतील मॉलमध्ये ऑर्चिड फाईड स्प्पा नावाचे मसाज सेंटर सुरु असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली. बनावट ग्राहक पाठवून माहितीची शहानिशा केली. त्याठिकाणी मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची त्यांची खात्री पटली. यानंतर संबंधित मसाज पार्लरवर छापा टाकला. मसाज पार्लरचा व्यवस्थापक अक्षय रामेश्वर ससेमल (रा.नांदेड सिटी) हा मसाज पार्लरमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करीत होता. कादर शेख ( रा.पापडे वस्ती, हडपसर)याच्या सांगण्यावरुन तो त्या मसाज सेंटरमध्ये सेक्स रॅकेट चालवत होता. गेल्या काही महिन्यांपूर्वी देखील अशाच प्रकारचे सेक्स रॅकेट या भागात उघडकीस आले होते. नांदेड सिटी सारख्या उच्चभ्रु वस्तीमध्ये याप्रकारच्या घटना घडत असल्याने परिसरांतील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.