नाशिकमध्ये सतरा लाख रुपयांची रोकड चोरी उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 17:31 IST2022-11-17T17:30:25+5:302022-11-17T17:31:45+5:30
गुन्ह्यातील संशयित पोलिसांच्या हाती लागले नसले तरी पोलीस पथकाने मध्यप्रदेश येथे जाऊन त्यांच्या घरातून रोकड जप्त केली आहे.

नाशिकमध्ये सतरा लाख रुपयांची रोकड चोरी उघड
संदीप झिरवाळ
नाशिक - पंधरा दिवसांपूर्वी पेठरोड येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून सतरा लाख रुपयांची रोकड चोरी प्रकरणी पंचवटी पोलिसांच्या गुन्हा शोध पथकाने मध्यप्रदेशातून 14 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.
विशेष म्हणजे या गुन्ह्यातील संशयित पोलिसांच्या हाती लागले नसले तरी पोलीस पथकाने मध्यप्रदेश येथे जाऊन त्यांच्या घरातून रोकड जप्त केली आहे. संशयितांनी सुरुवातीला बँकेत रेकी करून चोरी केली आहे. सदर गुन्ह्यात तीन संशयितांची नावे पुढे आली आहे असे पोलिसांनी सांगितले.