शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात सात खून; नांदेडमध्ये शिवाचार्य महाराजांची हत्या, तर बीडमध्ये ट्रिपल मर्डर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 11:16 IST

बीड शहरात पतीने पत्नीसह दोन मुलांची क्रूर हत्या केली, तर लातूर जिल्ह्यात क्वारंटाईनच्या वादातून दोघांची हत्या झाली.

ठळक मुद्देशिवाचार्य पशुपतिनाथ महाराज यांची शनिवारी मध्यरात्री हत्या झाल्याने देशभरात खळबळ उडाली.यापूर्वी पालघर जिल्ह्याच्या सीमेवर दोन साधूंची झालेली हत्या देशात चर्चेचा विषय बनला होता.

औरंगाबाद/नांदेड/लातूर : सर्वत्र कोरोनाची दहशत असताना रविवारी सात खुनांनी मराठवाडा हादरला. उमरी (जि. नांदेड) तालुक्यातील नागठाणा बु. येथे शिवाचार्य पशुपतिनाथ महाराज (३३) यांच्यासह अन्य एकाची एका माथेफिरूने निर्घृण हत्या केली.

बीड शहरात पतीने पत्नीसह दोन मुलांची क्रूर हत्या केली, तर लातूर जिल्ह्यात क्वारंटाईनच्या वादातून दोघांची हत्या झाली. उमरी तालुक्यातील नागठाणा बु. येथील मठाचे मठाधिपती शिवाचार्य पशुपतिनाथ महाराज यांची शनिवारी मध्यरात्री हत्या झाल्याने देशभरात खळबळ उडाली. यापूर्वी पालघर जिल्ह्याच्या सीमेवर दोन साधूंची झालेली हत्या देशात चर्चेचा विषय बनला होता.

आरोपी साईनाथ लिंगाडे हा याच गावचा रहिवासी असून, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो चोरीच्या उद्देशाने मठाच्या छतावरून शिवाचार्य महाराजांच्या खोलीत घुसला. मोठ्या कापडी रुमालाने त्याने महाराजांचा गळा आवळून खून केला़ मृतदेह कारच्या डिक्कीमध्ये टाकून कारसह पळून जाण्याच्या तयारीत असताना मठाच्या बाहेर निघताना कार (एमएच-२६ बीक्यू-१८००) गेटमध्ये अडकली. त्यामुळे छतावरील झोपलेले लोक जागे झाले. लोकांनी मठामध्ये महाराजांचा शोध घोतला. तोपर्यंत आरोपीने पळ काढला. या घटनेपूर्वी त्याने भगवान रामराव शिंदे (२, रा. चिंचाळा ता. उमरी) याचाही खून केला. तेलंगणातील तानूर पोलिसांनी त्याला अटक केली.- बीड शहरात पतीने पत्नीसह दोन मुलांची क्रूर हत्या केल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. अनैतिक संबंधाच्या संशयातून हत्या केल्याची कबुली पती संतोष कोकणे याने दिली असून, त्याला अटक करण्यात आली आहे. संगीता संतोष कोकणे (३५), सिद्धेश कोकणे (१३) बल्लू ऊर्फ कल्पेश कोकणे (९), अशी मृतांची नावे आहेत.- लातूर जिल्ह्यात उत्तर प्रदेशमधून आलेल्या तात्याराव बरमदे यास तू शेतात जाऊन राहा, असा सल्ला दिल्यामुळे राग आल्याने त्याने व त्याच्या साथीदारांनी शहाजी किसन पाटील (५०), वैभव बालाजी पाटील (२४) यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यात ते दोघेही गतप्राण झाले. ही घटना लातूर जिल्ह्यातील बोळेगाव (ता. निलंगा) येथे रविवारी पहाटे घडली. याप्रकरणी ८ जणांना अटक केली.

आणखी बातम्या...

CoronaVirus News : धक्कादायक! केस कापायला गेले अन् कोरोना घेऊन आले; तब्बल 91जण पॉझिटिव्ह झाले

CoronaVirus News : कोरोना नाही तर 'या' गोष्टींची वाटतेय लोकांना सर्वात जास्त भीती

सुपरफास्ट तंत्रज्ञान! फक्त एका सेकंदात तब्बल 1000 चित्रपट डाऊनलोड; इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड

CoronaVirus News : धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये गावकऱ्यांनी काढली गायीची अंत्ययात्रा अन् नंतर झालं असं काही...

CoronaVirus News : बापरे! आईच्या आजारपणाचं खोटं कारण देऊन पास मिळवला, रेड झोनमध्ये गेला अन्... 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादNandedनांदेडBeedबीड