Seriously injured seriously in police brutality; youth admitted in ICU | पोलिसांनी दंडुका मारल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी; आयसीयूत दाखल
पोलिसांनी दंडुका मारल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी; आयसीयूत दाखल

ठळक मुद्देदुचाकी थांबवली नाही म्हणून पोलिसाने पाठीमागून येऊन डोक्यात काठी मारली शुभम हा देवळाली गाव येथे राहणारा आहे.पोलिसांविरुद्ध तक्रार घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप जखमीच्या आई व भावाने केला आहे.

नाशिक : पोलिसांनी दुचाकी चालकाच्या डोक्यात दंडुका मारल्याने युवक गंभीर जखमी होऊन त्याला अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांविरुद्ध तक्रार घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप जखमीच्या आई व भावाने केला आहे.

शुभम ज्ञानेश्वर महाले  हा युवक दुचाकीवरून नाशिकरोड येथून द्वारकेकडे जात होता. दरम्यान, हेल्मेट सक्ती तपासणीकरीता नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांकडून या दुचकीस्वाराला काठी डोक्यात मारण्यात आल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. रक्तस्त्राव होऊन महाले कोसळला आणि तो बेशुद्ध झाल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. ही घटना सिन्नर फाटा पोलीस चौकी समोर घडली. त्यावेळी सोबत त्याचा भाऊदेखील होता. दुचाकी थांबवली नाही म्हणून पोलिसाने पाठीमागून येऊन डोक्यात काठी मारली शुभम हा देवळाली गाव येथे राहणारा आहे.


Web Title: Seriously injured seriously in police brutality; youth admitted in ICU
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.