सहा वर्षांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगाराला अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 17:46 IST2019-04-17T17:46:00+5:302019-04-17T17:46:12+5:30

पुणे शहर व पुणे ग्रामीण येथे खुन, अपहरण, खंडणी, दरोड्याची तयारी व चोरी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

The serial offenders who were absconding for six years were arrested | सहा वर्षांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगाराला अटक 

सहा वर्षांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगाराला अटक 

लोणी काळभोर : अपहरण ,खंडणी व चोरी सारख्या गंभीर गुन्ह्यात पुणे शहर व पुणे ग्रामीण येथून गेले ६ वर्षांपासून फरार असलेल्या प्रकाश उर्फ पिंक्या मारूती चौधरी ( वय ३०,  रा. बहुली, ता. हवेली) यांस पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने मुठा येथून अटक  केली.
     सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट स्थानिक गुन्हे शाखा यांचे पथकाने पिंक्या चौधरी यास मुठा येथून सापळा रचून ताब्यात घेतले. चौधरी हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर पुणे शहर व पुणे ग्रामीण येथे खुन, अपहरण, खंडणी, दरोड्याची तयारी व चोरी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. 
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक  संदिप पाटील, अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण विवेक पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जिवन माने, पोलीस हवालदार विजय काचंन, धिरज जाधव, लक्ष्मण राऊत,यांच्या पथकाने केली.

Web Title: The serial offenders who were absconding for six years were arrested