Sensational! Lovers committed suicide by hanging to a tree | खळबळजनक! झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाने केली आत्महत्या 
खळबळजनक! झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाने केली आत्महत्या 

ठळक मुद्देतेजल राजु मेंगाळ ( वय १९ वर्षे) व प्रदीप गजानन पथवे (वय २१ वर्षे) या तरुण प्रेमीयुगलाने गळफास घेऊन आत्महत्या केलीशिवारात उपळीच्या शेतात आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळून आले

अकोले (अहमदनगर) - तालुक्यातील जामगाव येथील तेजल राजु मेंगाळ ( वय १९ वर्षे) व प्रदीप गजानन पथवे (वय २१ वर्षे) या तरुण प्रेमीयुगलाने उपळीच्या शेतात अंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जामगाव गावातील तेजल राजु मेंगाळ ( वय १९ वर्षे) व प्रदीप गजानन पथवे (वय २१ वर्षे) या तरुण तरूणीचे प्रेम संबंध होते .५ नोव्हेंबर २०१९ रोजी सदर  हरवल्याप्रकरणी राजूर पोलिसांत मिसींग दाखल होते. त्यानंतर आज दुपारी १२.१५ दरम्यान जामगाव (ता अकोले) शिवारात उपळीच्या शेतात आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळून आले असल्याने राजू दामु मेंगाळ यांच्या खबरीबवरुन राजूर पोलीस स्टेशनला अकस्मात दाखल करण्यात आले आहे .पुढील तपास उपनिरीक्षक नितिन पाटील करत आहे. 

Web Title: Sensational! Lovers committed suicide by hanging to a tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.