खळबळजनक! उल्हासनगर वालधुनी नदीत सापडला महिलेचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 19:30 IST2019-09-13T19:29:33+5:302019-09-13T19:30:38+5:30
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठविला आहे.

खळबळजनक! उल्हासनगर वालधुनी नदीत सापडला महिलेचा मृतदेह
उल्हासनगर - कॅम्प क्रमांक ३ संजय गांधीनगर येथील वालधुनी नदीत सकाळी ११ वाजताच्या सुमारास एका २५ वर्षीय महिलेचा मृतदेह मिळाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. शितल साळवे असे मृत महिलेचे नाव असून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठविला आहे.
उल्हासनगर कॅम्प क्रमांक ५ लालचक्की, महात्मा फुले नगर परिसरात राहणारी शीतल साळवे असून आठ दिवसांपूर्वी प्रसुती होऊन एका चिमुकलीला जन्म दिला. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही महिला घरातून बाहेर निघून गेल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. मात्र, या महिलेचा मृतदेह उल्हासनगर रेल्वे स्टेशनशेजारील संजय गांधीनगर येथील वालधुनी नदीत आढळून आला. मध्यवर्ती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेचा मृतदेह नाल्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीसानी पंचनामा करुन गुन्हा हिललाईन पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. महिलेने आत्महत्या केली की तिची हत्या झाली. याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.