खळबळजनक! ठाण्यात तलावपाळी येथे तरुणीचा मृतदेह आढळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 17:14 IST2019-12-22T17:11:56+5:302019-12-22T17:14:39+5:30
या मृत तरुणीची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलीस प्रयत्न करत आहेत.

खळबळजनक! ठाण्यात तलावपाळी येथे तरुणीचा मृतदेह आढळला
ठाणे - तलावपाळी येथे आज सकाळच्या सुमारास एका २४ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला होता. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला असून या मृत तरुणीची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलीस प्रयत्न करत आहेत.
ठाणे शहरातील तलावपाळी परिसरात दररोज सकाळी नागरिक मॉर्निंग वॉक आणि जॉगिंगसाठी जात असतात. वॉक करत असलेल्या काही लोकांनी तलावपाळी परिसरात एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळून आला. त्या लोकांपैकी काहींनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान, या तरुणीने तलावात उडी मारून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत पोलीस तपास करत आहेत.
ठाणे - तलाव पाळी परिसरात २४ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला असून पोलिसांचा तपास सुरु https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) December 22, 2019