खळबळजनक! रिक्षा बाजूस घेण्यास सांगितल्याने मोटरसायकलस्वाराची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 14:17 IST2020-01-21T14:15:27+5:302020-01-21T14:17:56+5:30
याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी रिक्षाचालकाचा शोध सुरु आहे.

खळबळजनक! रिक्षा बाजूस घेण्यास सांगितल्याने मोटरसायकलस्वाराची हत्या
कल्याण - डोंबिवली पूर्वेकडील शेलार नाका येथे रिक्षाचालकाने बाईकस्वाराची चाकूने भोसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. किरकोळ वादातून ही हत्या करण्यात आली असून दोघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी रिक्षाचालकाचा शोध सुरु आहे.
ठाणे - डोंबिवली पूर्वेकडील शेलार नाका येथे रिक्षाचालकाने मोटरसायकलस्वाराची चाकूने भोसकून केली हत्या https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) January 21, 2020
रस्त्यात उभी असलेली रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याने झालेल्या वादातून बाईकवरून आलेल्या तिघा तरुणांवर चोपरने हल्ला करण्यात आल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. या हल्ल्यात जखमी झालेले प्रतीक गावडे, बाली जयस्वार, निलेश धुणे या तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रतीकचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात आरोपी झागऱ्या उर्फ रमेश घोरणाळ, चंदया जमादार, रवी लगाडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत .
डोंबिवली पूर्व शेलार नाका इंदिरा नगर येथे राहणारे प्रतीक गावडे, बाली जयस्वार, निलेश धुणे हे तिघे दुचाकीने काल रात्रीच्या सुमारास दावडीच्या दिशेने घराकडे परतत होते. यावेळी रवी लगाडे याची रिक्षा रस्त्यात उभी असल्याने प्रतीकने रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले. त्यामुळे प्रतीकचा रवी लगाडे याच्याशी वाद झाला. याच वादातून रवी लगाडे, रमेश घोरणाळ, चंदया जमादार यांनी प्रतीक गावडे बाली जयस्वार, निलेश धुणे यांना शेलार नाका येथे गाठत त्यांना बेदम मारहाण करत धारदार शस्त्राने हल्ला केला.
या हल्ल्यात तिघे ही जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यात प्रतिकला गंभीर दुखापात झाल्याने त्यचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी झागऱ्या उर्फ रमेश घोरणाळ, चंदया जमादार, रवी लगाडे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करत त्यांचा शोध सूरु केला आहे.