महिलेचा खून करून दागिने केले लंपास; जुन्नर तालुक्यातील धक्कादायक घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 12:53 IST2020-12-06T12:50:25+5:302020-12-06T12:53:11+5:30

Crime News : चोरलेला मुद्देमाल नाशिक येथून जप्त करत केल्याची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांनी दिली आहे.

senior woman murder in junnar | महिलेचा खून करून दागिने केले लंपास; जुन्नर तालुक्यातील धक्कादायक घटना 

महिलेचा खून करून दागिने केले लंपास; जुन्नर तालुक्यातील धक्कादायक घटना 

आळेफाटा -  साकोरी (ता. जुन्नर) येथे एका जेष्ठ महिलेचा खून करून दागिने लुटणाऱ्या आरोपीला पोलिसांनी २४ तासात गजाआड केले आहे. चोरलेला मुद्देमाल नाशिक येथून जप्त करत केल्याची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांनी दिली आहे.

जानकुबाई अर्जुन चोरे (वय ६५, रा साकोरी चोरे मळा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. अर्जुन शुभनारायण प्रसाद (वय २७ मुळ रा खबशी ता बनीयापुर छप्रा जि सारंग राज्य बिहार) असे आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी (दि ४) सकाळी १० वाजता जानकुबाई चोरे यांना अर्जुन शुभनारायण प्रसाद याने सेंट्रीगच्या कामाकरिता दुचाकीवरून बसून तो राहत असलेल्या खोलीत आणले. यावेळी त्याने तीक्ष्ण हत्याराने चोरे यांच्या डोक्यावर मारुन त्यांच्या अंगावरील दागिने घेऊन संशय येऊ नये म्हणून घरास कुलुप लावून पलायन केले.

सायंकाळी जानकुबाई चोरे घरी न आल्याने नातेवाईकांनी बाम्हणमळा येथील अर्जुन प्रसाद राहत असलेल्या घरी जात पाहिले असता घरास कुलुप होते. खिडकीतून आत डोकावून पाहीले असता त्यांना आतमध्ये जानकुबाई चोरे या मृतावस्थेत दिसल्या. आळेफाटा पोलिसांनी याप्रकरणी अर्जुन प्रसाद याचेविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. पोलीस आणि गुन्हे अन्वेशनच्या पथकाने आरोपीकडील मोबाईल लोकेशनचा अंदाज घेत नाशिक रेल्वेस्थानकातून अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर पवार करत आहेत.

 

Web Title: senior woman murder in junnar