कल्याणीनगर येथे ज्येष्ठ नागरिक महिलेचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 17:56 IST2019-09-27T17:55:35+5:302019-09-27T17:56:11+5:30
एका फ्लॅटमध्ये दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाकडून येरवडा पोलिसांना मिळाली होती...

कल्याणीनगर येथे ज्येष्ठ नागरिक महिलेचा खून
विमाननगर : कल्याणीनगर येथील एका जेष्ठ नागरिक महिलेचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी रात्री उघडकीस आला. चांदणी चौहान (वय 67,रा.सनशाईन कोर्ट सोसायटी, कल्याणीनगर) या जेष्ठ नागरिक महिलेचा खून केल्या प्रकरणी येरवडापोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
येरवडापोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणीनगर येथील सनशाईन कोर्ट सोसायटी येथील एका फ्लॅटमध्ये दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाकडून येरवडा पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता फ्लॅटमध्ये जेष्ठ नागरिक महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला.
ही महिला ठिकाणी भाड्याने राहत होती. मागील चार पाच दिवसांपासून तिला कोणीही पाहिले देखील नव्हते. चांदणी चौहान या येथे एकट्याच रहात होत्या.त्यांची भाची व भाचे जावई मुबंई येथे राहतात. गेल्या चार पाच दिवसांपासून त्यांचा संपर्क होत नसल्याचे त्यांचे मित्र मनिष पिंपुटकर (वय 43 रा.शिवाजीनगर) यांनी कल्याणीनगर येथे जाऊन माहिती घेण्यास सांगितले होते. गुरूवारी रात्री दहा वाजता पिपुंटकर कल्याणीनगर येथील चांदणी चौहान यांच्या सोसायटीतील फ्लॅटवर गेल्यावर खूनाचा गंभीर प्रकार उघडकीस आला. या खूनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनूस शेख करीत आहेत.