भाजप नगरसेवकाकडून चोरीच्या गाड्या जप्त; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 20:34 IST2018-08-10T20:33:48+5:302018-08-10T20:34:37+5:30
नगरसेवक विलास कांबळे यांनी इनोव्हा कार नंबर एमएच ०५ बी एस ४६५६ ही त्याचा मित्र एकनाथ शेळके यांच्या नावे २०१३ मध्ये विकत घेऊन गाडीचे आरटीओ रजिस्ट्रेशन २०१३चे न करता या गाडीवर एमएच ०५ बीएस ४६५६ अशी बनावट नंबर प्लेट लावून वापरली जात होती.

भाजप नगरसेवकाकडून चोरीच्या गाड्या जप्त; गुन्हा दाखल
ठाणे - ठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे याच्याकडून चोरीच्या दोन गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून दोन्ही गाड्या पोलिसांनी जप्त करून पोलीस ठाण्यात ठेवल्या आहेत.
नगरसेवक विलास कांबळे यांनी इनोव्हा कार नंबर एमएच ०५ बी एस ४६५६ ही त्याचा मित्र एकनाथ शेळके यांच्या नावे २०१३ मध्ये विकत घेऊन गाडीचे आरटीओ रजिस्ट्रेशन २०१३चे न करता या गाडीवर एमएच ०५ बीएस ४६५६ अशी बनावट नंबर प्लेट लावून वापरली जात होती. त्याने शासनाची रजिस्ट्रेशन फी आणि वाहन कर न भरता या गाडीचे रजिस्ट्रेशन झाले असे भासवून फसवणूक केली. अशी तक्रार आरटीओ कार्यालयााकडून माहिती बिनू वर्गिस यांनी दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला.