शहरं
Join us  
Trending Stories
1
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
2
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
3
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
4
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
5
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
6
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
7
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
8
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
10
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
11
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
12
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
13
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
14
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
15
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
16
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
17
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
18
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
19
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
20
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं

साडेसात कोटींचे रक्तचंदन जप्त; त्रिकुट अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 20:43 IST

गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई

ठळक मुद्देगुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष-९ च्या पथकाने ही कामगिरी केली आहे.सांताक्रुझ येथे दोन टॅम्पोतील तब्बल १५५६ किलो रक्तचंदन जप्त केले असून याप्रकरणी तिघाजणांना अटक केली.

मुंबई - विक्रीसाठी बंदी असलेल्या दुर्मिळ रक्तचंदन लाकडाची तस्करी करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा छडा लावण्यात मुंबईच्या गुन्हा अन्वेषण शाखेला यश आले आहे. पश्चिम उपनगरातील सांताक्रुझ येथे दोन टॅम्पोतील तब्बल १५५६ किलो रक्तचंदन जप्त केले असून याप्रकरणी तिघाजणांना अटक केली.असगर इस्माईल शेख (४९), अली शेख (३२)व वाजिद अन्सारी(३२) अशी त्यांची नावे असून जप्त केलेले रक्तचंदन सुमारे ७ कोटी ५० लाख रुपये किंमत असून ते परदेशात पाठविण्यात येणार होते, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष-९ च्या पथकाने ही कामगिरी केली आहे.आर्युवेदामध्ये अत्यंत महत्वपूर्ण समजले जाणाऱ्या रक्तचंदनाच्या लाकडाची तस्करी दोन टॅम्पोमधून करण्यात येणार असल्याची माहिती कक्ष-९चे निरीक्षक संजीव गावडे यांना मिळाली. त्यांनी याबाबत उपायुक्त अकबर पठाण, सहाय्यक आयुक्त भरत भोईटे व प्रभारी निरीक्षक महेश देसाई यांनी सापळा रचला. सोमवारी रात्री सातांक्रुझ पश्चिम येथे द्रुतगती महामार्गावरुन जात असलेल्या दोन टॅम्पो अडविले. त्याची झडती केली असता त्यामध्ये रक्त चंदनाच्या लाकडाची बुधे असल्याचे आढळून आले. टॅम्पोसोबत मिळून आलेल्या तिघाजणांना अटक केली. रक्त चंदनाची किंमत साडे सात कोटी रुपये असून ते गुजरातमार्गे वाहतूक करुन परदेशात पाठविण्यात येणार होती, या तस्करीचा मुख्य सूत्रधार कोण, ती कोठून आणण्यात आली, याबाबत चौकशी करण्यात येत असल्याचे उपायुक्त अकबर पठाण यांनी सांगितले.

टॅग्स :ArrestअटकMumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारीraidधाडPoliceपोलिस