शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

मीरा भाईंदरमध्ये अलगीकरण कक्षात २० वर्षीय महिलेवर सुरक्षारक्षकाकडून बलात्कार  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 2:33 PM

झाल्या प्रकाराची वाच्यता करू नये म्हणून पीडितेच्या ७ महिन्याच्या मुलीस मारण्याची धमकी आरोपीने दिली होती

मीरारोड - मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अलगीकरण कक्षात एका २० वर्षीय विवाहितेवर पालिकेच्या ठेक्यावरील काम करणाऱ्या सैनिक सिक्युरिटीच्या सुरक्षा रक्षकाने सतत तीन दिवस बलात्कार केल्याच्या फिर्यादीवरून नवघर पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे . या घटनेने खळबळ उडाली असून वाच्यता करू नये म्हणून पीडितेच्या ७ महिन्याच्या मुलीस मारण्याची धमकी आरोपीने दिली होती .पीडिता हि मीरारोड परिसरात राहणारी असून तिला ७ महिन्याची मुलगी आहे . तिच्या घरातील आत्याची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने पिडीतेसह घरातील सदस्यांना २४ मे रोजी महापालिकेच्या भाईंदर पूर्व येथील स्व . गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुलासमोरील अलगीकरण कक्षात दाखल केले होते . सदर इमारतीत लहान सदनिका असल्याने प्रत्येकास स्वतंत्र सदनिकेत ठेवले जाते .या ठिकाणी पालिकेचा ठेकेदार सैनिक सिक्युरिटीचा सुरक्षा रक्षक विक्रम बाबूसिंग शेरे ( २७ ) रा . गुजराती चाळ , मोती नगर , भाईंदर ( पश्चिम ) याने लहान मुलीला दुध व गरम पाणी देण्याच्या बहाण्याने पिडीतेशी ओळख केली . फिर्यादी नुसार विक्रम याने २, ३ व ४ जून रोजी रात्रीच्या सुमारास पीडितेला ठेवलेल्या १०७ क्रमांकाच्या सदनिकेत जाऊन तिला धमकावून जबरदस्ती शारीरिक संबंध केले . कुठे वाच्यता केल्यास मुलीला ठार मारेन अशी धमकी आरोपीने दिली .५ जून रोजी पीडितेला दुसरीकडे हलवण्यात आले . बरी होऊन ती घरी परतली . परंतु ऑगस्टमध्ये तिला गर्भ राहिल्याचे लक्षात आले . घरात तिच्या नवऱ्याला हा प्रकार समजल्या नंतर त्याने तिला सोडचिठ्ठी दिली . पीडितेने भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावर शनिवारी रात्री विक्रम विरुद्ध बलात्कार सह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे . आरोपी विक्रम देखील विवाहित असून त्याला दोन मुली आहेत असे सूत्रांनी सांगितले .पोलिस निरीक्षक संपत पाटील यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक निरीक्षक साहेबराव पोटे हे पुढील तपास करत आहेत . या घटनेचा आमदार गीता जैन यांनी निषेध केला असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे . महापालिका अलगीकरण कक्ष आणि कोविड सेंटर मध्ये जे ठेक्यावरील कर्मचारी नेमत आहे त्यांचे चारित्र्य पडताळणी दाखले सक्तीचे करावेत . सीसीटीव्ही मार्फत सतत नियंत्रण ठेवावे . कर्मचाऱ्यांना अशी गैरकृत्ये करण्याचा विचार येतोच कसा ? त्यांना जरब बसेल अशी कठोर पावले पालिकेने उचलावीत . ठेकेदारावर कारवाई करावी असे आ. गीता जैन म्हणाल्या .आमदार प्रताप सरनाईक म्हणाले कि , शहरातील बलात्काराच्या वाढत्या तक्रारी चिंताजनक असून, यात पालिका किंवा राजकीय पक्षाशी संबंधित आरोपी असणे हे अतिशय गंभीर आहे . या प्रकरणी आपण पोलीस आयुक्तांना भेटून निवेदन देणार आहे . सैनिक सिक्युरिटीच्या तक्रारी सतत वाढत असून ठेकेदाराचा ठेका रद्द करून काळ्या यादीत टाका .

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस