Security gaurd molested student who came for SSC exam pda | सुरक्षारक्षक बनला भक्षक, विद्यार्थिनीसोबत केले अश्लील चाळे 

सुरक्षारक्षक बनला भक्षक, विद्यार्थिनीसोबत केले अश्लील चाळे 

ठळक मुद्देशाळेत सुरक्षा रक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पॉक्सो कायद्यान्वये सुरक्षारक्षकाविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे - कल्याणमधील एका नामांकित इंग्रजी शाळेत दहावीचा परिक्षा सुरु असताना या सेंटरमध्ये आलेल्या एका पंधरा वर्षीय विद्यार्थीनीसोबत अश्लिल चाळे करणाऱ्या शाळेच्या सुरक्षारक्षकाला बाजारपेठ पोलिसांनीअटक केली आहे. याप्रकरणी पॉक्सो कायद्यान्वये सुरक्षारक्षकाविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरक्षारक्षक शाळेत असताना दहावीच्या परिक्षेसाठी आलेली मुलगी शाळेच्या आवारात उभी असताना गणेशने तिला शाळेचे कँटीन दाखविण्याच्या बहाण्याने अश्लील स्पर्श केला. दुपारी तिला संपूर्ण शाळा दाखवतो असे सांगितले. कशीतरी विद्यार्थीनीने परिक्षा दिली. नंतर घडला प्रकार नातेवाईकांना सांगितला. घडला प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर सुरक्षारक्षकाला बाजारपेठ पोलिसांनीअटक केली. मात्र, शाळेत सुरक्षा रक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

Web Title: Security gaurd molested student who came for SSC exam pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.