भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल बसखाली आली स्कुटी, चालकाचा चिरडून झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 15:59 IST2022-07-06T15:59:01+5:302022-07-06T15:59:37+5:30
Accident Case :याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात ट्रॅव्हल चालकांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल बसखाली आली स्कुटी, चालकाचा चिरडून झाला मृत्यू
सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-३, १७ सेक्शन ते हिराघाट रस्त्यावरमंगळवारी पहाटे १ वाजता भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रॅव्हलच्या खाली स्कुटी चालक राहुल पळसकर सापडून त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात ट्रॅव्हल चालकांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगर १७ सेक्शन चौकातून हिराघाट मार्गे कल्याण येथे स्कुटी गाडीवरून राहुल साईनाथ पळसकर मंगळवारी पहाटे १ वाजता जात होते. त्यावेळी भरधाव आलेल्या ट्रॅव्हल्स बसने स्कुटी गाडीला जोरदार धडक दिल्याने, पळसकर खाली पडले. त्यांच्या डोक्यावरून व पायावरून ट्रॅव्हल्स बसची चाके जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची ट्रॅव्हल्स चालकाने कोणतीही माहिती पोलिसांना न देता ट्रॅव्हल्स बससह पळून गेला. मध्यवर्ती पोलिसांनी भरपावसात अपघाताचा पंचनामा करून मृतदेह उत्तर तपासणीसाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी पोलिसांनी ट्रॅव्हल बस चालकांवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करण्यात येत आहे.