सौरभ राजपूतची 'ही' छोटीशी चूक ठरली त्याच्या मृत्यूचं कारण; मुस्कानच्या आईचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 13:41 IST2025-03-24T13:40:42+5:302025-03-24T13:41:52+5:30
सौरभ हत्याकांडात दररोज मोठे खुलासे होत आहेत. आता मुस्कानच्या आईने या हत्येबाबत धक्कादायक विधान केलं आहे.

सौरभ राजपूतची 'ही' छोटीशी चूक ठरली त्याच्या मृत्यूचं कारण; मुस्कानच्या आईचा मोठा खुलासा
सौरभ हत्याकांडात दररोज मोठे खुलासे होत आहेत. आता मुस्कानच्या आईने या हत्येबाबत धक्कादायक विधान केलं आहे. सौरभची एक छोटीशी चूक त्याच्याच मृत्यूचं कारण बनली असं म्हटलं आहे. मुस्कानची आई कविता रस्तोगी म्हणाली की, "आम्ही लग्नापूर्वी कधीही मुस्कानला फोन दिला नाही. पण लग्नानंतर सौरभने स्वतः तिला फोन वापरण्याची परवानगी दिली."
"सौरभनेच मुस्कानला साहिलशी बोलण्याची परवानगी दिली होती कारण ते दोघेही वर्गमित्र होते. पण ही छोटीशी चूक नंतर त्याच्या मृत्यूचं सर्वात मोठं कारण बनली. सौरभचा त्याच्या पत्नीवर खूप विश्वास होता, पण हा विश्वास त्याची सर्वात मोठी कमजोरी बनली. मुस्कानची संगत चुकीची होती. पण सौरभला तो कोणता मार्ग निवडत आहे याची काहीच कल्पना नव्हती."
"आमच्या मुलीने जे केलं ते अक्षम्य आहे. जर मुस्कान दोषी असेल तर तिला सर्वात कठोर शिक्षा झाली पाहिजे. दोघांनाही फाशी दिली पाहिजे." हे प्रकरण देशभर चर्चेचा विषय बनलं आहे. पोलीस तपासात असं दिसून आलं आहे की, सौरभची हत्या अतिशय सुनियोजित पद्धतीने करण्यात आली होती. त्याचा मृतदेह निळ्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये लपवण्यात आला होता.
मुस्कानने ३३ रुपयांना खरेदी केलं नशेचं इंजेक्शन; मेडिकल स्टोअरवरील छाप्यात धक्कादायक खुलासे
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडलेल्या सौरभ हत्याकांडात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. हत्या प्रकरणातील आरोपी आणि मृत सौरभची पत्नी मुस्कानबाबत आणखी धक्कादायक माहिती मिळाली आहे. मुस्कानला औषधं देणाऱ्या मेडिकल स्टोअरवर छापा टाकण्यात आला. ज्यामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी उघड झाल्या आहेत. अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाच्या पथकाने रविवारी उषा मेडिकल स्टोअरवर छापा टाकला. मुस्कानने ३३ रुपयांचे मेझोलम नावाचं नशेचं इंजेक्शन देखील खरेदी केलं होतं. मुस्कानने तिच्या मोबाईलमधील प्रिस्क्रिप्शन दाखवून हे खरेदी केल्याचं म्हटलं जात आहे