दुर्गापुरात रंगला सट्टा; पाच जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 20:19 IST2023-04-07T20:18:34+5:302023-04-07T20:19:35+5:30

ख्रिश्चन हॉस्पिटल तुकूम परिसरात जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती दुर्गापूर पोलिसांना मिळाली होती.

Satta in Parimal Dohne Durgapur Five people arrested | दुर्गापुरात रंगला सट्टा; पाच जणांना अटक

दुर्गापुरात रंगला सट्टा; पाच जणांना अटक

चंद्रपूर : दुर्गापूर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तुकूम परिसरातील ख्रिश्चन हॉस्पिटल रोडवरील तुकूम परिसरातील जुगार अड्ड्यावर दुर्गापूर पोलिसांनी धाड टाकून ११ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाई पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

आशिष विनायक डहाके (३४, रा. रामनगर), राकेश चौधरी (३९, रा. तुकूम), मयुर सूर्यभान झिलपे (२५, रा. तुकूम), आशिष निळकंठ आटे (३६), संतोषी विठ्ठल चौधरी (४७, सर्व रा. तुकूम) असे अटकेतील आरोपींचे नाव आहे.

ख्रिश्चन हॉस्पिटल तुकूम परिसरात जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती दुर्गापूर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर दुर्गापूर पोलिस तेथे धाड टाकली. यावेळी पाचजण जुगार खेळताना दिसून आले. पोलिसांनी पाचही जणांना अटक करून घटना स्थळावरून ११ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ठाणेदार अनिल जिट्टावार यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Web Title: Satta in Parimal Dohne Durgapur Five people arrested