महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 09:52 IST2025-10-27T09:52:00+5:302025-10-27T09:52:53+5:30
Satara Phaltan Women Doctor death case: सातारा जिल्ह्यातील फलटण शहरात एका महिला डॉक्टरने हॉटेलच्या खोलीत आत्महत्या केली होती. या प्रकरणात वेगवेगळे खुलासे होत आहेत.

महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणात न्यायालयाने आरोपी पीएसआय गोपाल बदने याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आत्महत्येपूर्वी महिला डॉक्टरने आपल्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये बदनेने आपल्यावर चारवेळा बलात्कार केला होता असे लिहिले होते. सोबतच प्रशांत बनकर याने देखील शारीरिक आणि मानसिक अत्याचार केल्याचे म्हटले होते. ही महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती, याचे कारण समोर आले आहे.
महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट
सातारा जिल्ह्यातील फलटण शहरात एका महिला डॉक्टरने हॉटेलच्या खोलीत आत्महत्या केली होती. ही डॉक्टर काही दिवसांपूर्वीच हॉटेलमध्ये राहण्यासाठी आली होती. ती प्रशांत बनकर याच्या घरी वरच्या मजल्यावर राहत होती. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाला होता आणि प्रशांतने डॉक्टरांना घर रिकामे करण्यास सांगितले होते. घर सोडल्यानंतर डॉक्टर हॉटेलमध्ये राहू लागल्या होत्या, असे समोर येत आहे.
आता सुरू होईल सखोल चौकशी
आरोपी पीएसआय गोपाल बदने यांना रविवारी फलटण न्यायालयात हजर करण्यात आले.न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी आरोपी बदने याच्या कार, मोबाईल, वैद्यकीय अहवाल आणि घटनास्थळाची फॉरेन्सिक तपासणी सुरू केली आहे. पुढील 5 दिवसांच्या पोलिस कोठडीतून अनेक महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.