धर्म लपवून मंदिरात घेतली सप्तपदी; बिंग फुटल्यावर पत्नीलाच मारायला सुरुवात केली

By पूनम अपराज | Published: December 12, 2020 05:13 PM2020-12-12T17:13:12+5:302020-12-12T17:13:48+5:30

Crime News : डीसीपी रोहिणी यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी भादंवि कलम  419, 467, 468, 471, 474, 376, 506, 34  अन्वये गुन्हा दाखल केला आहे आणि तीन जणांना अटक केली आहे.

Saptapadi taken in the temple hiding religion; When reality exploded, he started beating his wife | धर्म लपवून मंदिरात घेतली सप्तपदी; बिंग फुटल्यावर पत्नीलाच मारायला सुरुवात केली

धर्म लपवून मंदिरात घेतली सप्तपदी; बिंग फुटल्यावर पत्नीलाच मारायला सुरुवात केली

Next
ठळक मुद्दे शेजाऱ्यांची मदत घेतल्यानंतर पीडितेने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून विवाहित मुलीची सुटका केली.

दिल्लीतील रोहिणी परिसरातील प्रेम नगर भागात एका व्यक्तीने आपले नाव बदलून आपला धर्म लपविला आणि मुलीला त्याच्या प्रेम जाळ्यात अडकविले आणि आर्य समाज मंदिरात लग्न केले. लग्नानंतर सत्य बाहेर आल्यावर पीडित मुलीने आरोपी युवकाला विरोध केला आणि तिच्या कुटूंबाकडे जाण्याचा आग्रह सुरू केला. यावर आरोपी पतीने तिला मारहाण केली व तिच्यावर अत्याचार केला.

लव्ह जिहाद : धर्म लपवून ओढले प्रेमाच्या काळात, बंधक बनून दुष्कर्म करून केला निकाह  

 

शेजाऱ्यांची मदत घेतल्यानंतर पीडितेने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून विवाहित मुलीची सुटका केली. डीसीपी रोहिणी यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी भादंवि कलम  419, 467, 468, 471, 474, 376, 506, 34  अन्वये गुन्हा दाखल केला आहे आणि तीन जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मुख्य आरोपीचे वडील आणि दोन भाऊ यांचा समावेश आहे, तर मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. असा दावा केला जात आहे की, आरोपी अख्तरने आपला धर्म लपवून आणि बनावट नाव सांगून या युवतीशी मैत्री केली आणि प्रेम प्रकरणानंतर आर्य समाज मंदिरात त्या मुलीशी लग्न झाले. लग्नानंतर आरोपीची ओळख उघड झाली. तिच्यावरही अत्याचार करून विनयभंग करण्यात आला.

Web Title: Saptapadi taken in the temple hiding religion; When reality exploded, he started beating his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.