शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

सांताक्रूज टोळी युद्ध प्रकरण, गँगस्टर जेनिटो कार्दोज पोलिसांना शरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 18:51 IST

दीड महिन्याहून अधिक काळ बेपत्ता राहून बुधवारी पणजी उपविभागीय पोलीस अधिकारी उत्तम राऊत देसाई यांना शरण आला.

ठळक मुद्देजेनिटो हा सांताक्रूझ येथील टोळी युद्धातील मास्टरमाईंड असल्याचा जुने गोवा पोलिसांचा दावा आहे.पोलिसांना गुंगारा देत इतका काळ जेनिटो कुठे होता हेही त्यांनी आता पोलिसांना सांगितले.

पणजी: सांताक्रूज येथील टोळीयुद्ध प्रकरणात पोलिसांना हवा असलेला गँगस्टर जेनिटो कार्दोज बुधवारी पोलीसाां शरण आला. दीड महिन्याहून अधिक काळ बेपत्ता राहून बुधवारी पणजी उपविभागीय पोलीस अधिकारी उत्तम राऊत देसाई यांना शरण आला.

जेनिटो हा सांताक्रूझ येथील टोळी युद्धातील मास्टरमाईंड असल्याचा जुने गोवापोलिसांचा दावा आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची कोठडीतील चौकशी करण्यात आल्यानंतर पोलिसांना ही माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी जेनिटोच्या विरोधात गुन्हा नोंद केला होता. या टोळी युद्धात एकाचा खूनही झाला होता. परंतु गुन्हा नोंद होताच जेनिटो अटक चुकविण्यासाठी बेपत्ता झाला होता.  दीड महिन्यापेक्षा अधिक काळ आटापिटा करूनही त्याला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले नव्हते. शरण आलेल्या जेनिटोला जुने गोवा पोलिसांनी अटक केली असून रिमांडवर पोलीस कोठडीत ठेवण्यात अले आहे.

 

पोलिसांना गुंगारा देत इतका काळ जेनिटो कुठे होता हेही त्यांनी आता पोलिसांना सांगितले. तो महाराष्ट्रात पळाला होता. महाराष्ट्रातही त्याचे काही मित्र आहेत. त्यातील काही गुन्हेगारी पार्श्वभुमीचेही मित्र आहेत. त्यापैकी काहींना जुने गोवा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. परंतु त्यांच्याकडून जेनिटोचा पत्ता काढून घेण्यास पोलिसांना यश आले नव्हते. अलिकडेच सावंतवाडीच्या एका युवकालाही पोलीस घेऊन आले होते. दीड दिवस चौकशीनंतर त्याला सोडुन देण्यात आले होते.अपहरण प्रकरणातही वॉन्टेडजेनिटो हा सांताक्रूझ टोळी युद्ध प्रकरणात जसा जुने गोवा पोलिसांना हवा आहे तसाच तो पणजी पोलिसांनाही वेगळ््या गुन्हा प्रकरणासाठी हवा आहे. करंजाळे येथील युवकाचे अपहरण करून त्याला सक्तीने मालमत्तेच्या विक्रीकरारावर स्वाक्षरी करण्यास त्याने भाग पाडल्याची तक्रार पणजी पोलीस स्थानकात करण्यात आली होती. पणजी पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंद करून जेनिटोच्या साथिदारांना अटक केली होती, परंतु जेनिटो सापडला नव्हता....म्हणून  शरणागतीइतका काळ पोलिसांना गुंगारा देत राहिलेला जेनिटो कार्दोज पोलिसांना शरण आला हे काहींना आश्चर्य वाटण्यासारखे असले तरी त्याच्यापुढे दुसरा पर्याय नव्हता. एक म्हणजे त्याने दाखल केलेला अटकपूर्व जामीनचा अर्ज पणजी सत्र न्यायालयाने फेटाळला होता. या प्रकरणात त्याने सत्र न्यायालयाच्या आदेशाला खंडपीठात आव्हान दिले असले तरी स्वत: जेनिटो हा तपासासाठी सहकार्य करीत नसल्याचे त्याने बेपत्ताराहून सिद्ध केले होते. त्यामुळे खंडपीठात जाऊन फार काही मोठे पदरात पडणार नाही याचा अंदाज आल्यामुळे शरणागतीशिवाय दुसरा पर्याय त्याच्या त्याच्याकडे नव्हता.  

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी 

 

महिलेचा संशयास्पद मृत्यू, सासरच्या लोकांवर हत्या केल्याचा आरोप

 

कंटेनरच्या कंटेनर चोरणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद 

 

काश्मीरमध्ये लष्कराच्या गस्तीपथकावर दहशतवादी हल्ला, जवान जखमी

 

Sushant Singh Rajput Suicide : नवं वळण! पाटणा पोलिसांविरोधात FIR दाखल करण्यासाठी मुंबईत तक्रार दाखल

 

Sushant Singh Rajput Suicide : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार, पाटणा पोलिसांकडे अटकेची मागणी 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवाPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र