शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

Sameer Wankhede, Aryan Khan Drug Extortion case: समीर वानखेडे सुटले? आर्यन खान प्रकरणी वसुलीचा पुरावा सापडला नाही; मुंबई पोलीस हताश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 7:41 PM

Sameer Wankhede, Aryan Khan Drug Extortion case: आर्यन खान केसमध्ये त्याची सुटका करण्यासाठी 25 कोटी रुपये मागण्यात आले होते. त्यापैकी 18 कोटींची डील ठरल्याचा आरोप प्रभाकर साईल या पंचाने केला होता. यावर मुंबई पोलिसांनी चौकशी समिती नेमली होती.

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला मुंबईतून एनसीबीने एका क्रूझवरून ताब्यात घेतले होते. या क्रूझ ड्रग्ज प्रकरणी शाहरुख खानकडून 25 कोटी रुपये वसूल करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप एका एनसीबीच्या पंचाने केला होता. परंतू त्या आरोपांचे पुरावेच मुंबई पोलिसांना मिळाले नसल्याचे समोर आले आहे. यामुळे 31 डिसेंबरला एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक म्हणून समीर वानखेडेंचा कार्यकाळ सुखासुखी संपणार असल्याची चिन्हे आहेत.

1 ऑक्टोबरला आर्यन खान त्याचा मित्र अरबाझ मर्चंट आणि अभिनेत्री मुनमुन धमेचा यांना क्रूझ पार्टीतून ताब्यात घेण्यात आले होते. महिनाभर या प्रकरणाने धुरळा उडविला होता. या कारवाईमुळे समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले होते. नंतर राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडेंवर खोट्या जात प्रमाणपत्राचे आरोप केले आहेत. महिनाभर हा मुद्दादेखील गाजला होता.मुंबई पोलिसांनी खंडणी प्रकरणी चौकशी समिती स्थापन केली होती. एएनआय वृत्तसंस्थेला पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आर्यन खान वसुली प्रकरणी कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत. पुढील आदेश येईपर्यंत कथित वसुलीच्या आरोपांची चौकशी थांबविण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी 20 जणांची चौकशी केली आहे, मात्र काही पुरावा सापडलेला नाही. यामुळे गुन्हादेखील दाखल करत आलेला नाही, असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.

काय होते प्रकरण...आर्यन खान केसमध्ये त्याची सुटका करण्यासाठी 25 कोटी रुपये मागण्यात आले होते. त्यापैकी 18 कोटींची डील ठरल्याचा आरोप प्रभाकर साईल या पंचाने केला होता. शाहरुखची मॅनेजर पुजा ददलानी हिच्याकडे हे पैसे मागितले गेले होते. यानंतर सॅम डिसुझा नावाच्या एका व्यक्तीने दावा केलेला की किरण गोसावी, सॅम आणि पुजा ददलानी भेटले होते. या रकमेपैकी 50 लाख रुपये ददलानीने दिले होते. मुंबई पोलीस हे तिघे भेटले त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासत होते.

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानSameer Wankhedeसमीर वानखेडेMumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी