शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

संजय दत्तला AK-56 देणारा समीर हिंगोरा अन् माहीम दर्ग्याचे ट्रस्टी रडारवर, NIAची D कंपनीवर मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 17:27 IST

NIA Action on D company : या प्रकरणी टाडा न्यायालयाचे तत्कालीन न्या. प्रमोद कोदे यांनी समीर हिंगोरा याला 9 वर्षांची शिक्षाही सुनावली होती. समीर हिंगोरा हा व्यवसायाने चित्रपट निर्माता आहे.

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात आज सकाळपासून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेल्या जवळपास 20 ठिकाणी NIA टीम छापे टाकत आहे. या छाप्यात समीर हिंगोरा याचे नाव समोर आले आहे. सध्या NIAने समीर हिंगोरा याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. समीर हिंगोरा हा तो व्यक्ती आहे, ज्याने बॉलीवूडच्या मुन्ना भाई संजय दत्तला AK-56 रायफल दिली होती. संजय दत्तला शस्त्रे देण्यात या व्यक्तीची महत्त्वाची भूमिका होती. संजय दत्तला समीर हिंगोरा याच्या वाहनातून AK-56 पाठवण्यात आली होती. या प्रकरणी टाडा न्यायालयाचे तत्कालीन न्या. प्रमोद कोदे यांनी समीर हिंगोरा याला 9 वर्षांची शिक्षाही सुनावली होती. समीर हिंगोरा हा व्यवसायाने चित्रपट निर्माता आहे.चित्रपट अभिनेता संजय दत्त हा देखील १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी होता. त्याला टाडा न्यायालयाने शिक्षाही सुनावली होती. नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. सध्या संजय दत्तची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर तुरुंगातून सुटका झाली आहे.

माहीम दर्ग्याचे विश्वस्तही रडारवरएनआयएने आज पहाटे मुंबईतील सुप्रसिद्ध माहीम दर्गा आणि हाजी अली दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खंडवानी यांच्या घरावर छापे टाकले. मिळालेल्या माहितीनुसार, NIA अधिकारी अजूनही सोहेल खंडवानी यांची त्यांच्या घरी चौकशी करत आहेत. एनआयएने या प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा खास व्यक्ती छोटा शकीलच्या मेहुणीचा पती सलीम फ्रुट यालाही ताब्यात घेतले आहे. एनआयएचे अधिकारीही सलीम फ्रूटची चौकशी करण्यात गुंतले आहेत.

छोटा शकीलचा साथीदार सलीम फ्रूटला NIAने घेतले ताब्यात20 ठिकाणी छापे टाकलेएनआयएची ही छापेमारी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसाठी मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. तपास यंत्रणेने नागपाडा, भेंडीबाजार, मुंब्रा, भिवंडी, गोरेगाव, बोरिवली सांताक्रूझ आणि मुंबईतील इतर ठिकाणी छापे टाकले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएच्या छाप्यादरम्यान अनेक महत्त्वाची कागदपत्रे सापडली आहेत. एनआयएने मुंबईतील भेंडी बाजार परिसरातून छोटा शकीलसह सलीम कुरेशी आणि सलीम फ्रुटला ताब्यात घेतले आहे.

 

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाCrime Newsगुन्हेगारीDawood Ibrahimदाऊद इब्राहिमChhota Shakeelछोटा शकील