Salute Khaki ! Police constable donates donations to Home Minister to CM Corona Fund pda | खाकीला सॅल्यूट! पोलीस कॉन्स्टेबलने गृहमंत्र्यांकडे दिले डोनेशन, मदतीसाठी उचलला खारीचा वाटा

खाकीला सॅल्यूट! पोलीस कॉन्स्टेबलने गृहमंत्र्यांकडे दिले डोनेशन, मदतीसाठी उचलला खारीचा वाटा

ठळक मुद्देया कर्तबगार दानशूराचं नाव श्रीदर्शन डंगरे असं आहे.पोलिस हेड काँस्टेबल श्रीदर्शन बापूसाहेब डंगरे यांनी मुख्यमंत्री कोरोना सहय्यता निधीत 10 हजार रुपयांची मदत केली आहे. गृहमंत्र्यांनी कॉन्स्टेबल डंगरे यांचं कौतुक आणि आभार मानले आहे. 

 मुंबई - मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत असून रुग्णांच्या संख्येत देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने विविध उपाययोजना करत आहेत. याकोरोनाच्या लढाईला धैर्याने सामोरे जात आहेत ते डॉक्टर, नर्स यांच्यासोबतच महाराष्ट्र पोलीस. तसेच पोलिसांनी खाकीला सॅल्यूट ठोकावा अशी गोष्ट पोलीस कॉन्स्टेबलने केली आहे. एका पोलीस हेड कॉन्स्टेबलने देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटासाठी मुख्यमंत्री कोरोना सहाय्यता निधीत डोनेशन देऊन खारीचा वाटा उचलला आहे. या कर्तबगार दानशूराचं नाव श्रीदर्शन डंगरे असं आहे. 

पोलिस हेड काँस्टेबल श्रीदर्शन बापूसाहेब डंगरे यांनी मुख्यमंत्री कोरोना सहय्यता निधीत 10 हजार रुपयांची मदत केली आहे. थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांना डंगरे यांनी १० हजार रुपयांचा धनादेश दिला आहे. याबाबत ट्वीट करुन हेड काँस्टेबल श्रीदर्शन बापूसाहेब डंगरे यांचं महाराष्ट्राच्या जनतेतर्फे कौतुक आणि आभार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मानले आहे. देशावर आलेल्या संकटाशी तोंड देताना कुठे काही पोलीस हातावरचं पोट असणाऱ्या गोरगरीबांना जेवण देत आहेत तर काही पोलिस मुख्यमंत्री कोरोना सहाय्यता निधीला योगदान देत आहेत. मुंबईतील डोंगरी येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीदर्शन डंगरे यांनी १० हजार रुपयांच आर्थिक योगदान दिलं आहे. यावेळी गृहमंत्र्यांनी कॉन्स्टेबल डंगरे यांचं कौतुक आणि आभार मानले आहे. 

 

Web Title: Salute Khaki ! Police constable donates donations to Home Minister to CM Corona Fund pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.