Coronavirus : बापरे! ७० हजारांना दोन रेमडेसिविरची केली विक्री; तिघांना ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 21:06 IST2021-04-21T21:06:16+5:302021-04-21T21:06:59+5:30
Remdesivir Black Marketing : सीताबर्डी पोलिसांची कारवाई

Coronavirus : बापरे! ७० हजारांना दोन रेमडेसिविरची केली विक्री; तिघांना ठोकल्या बेड्या
ठळक मुद्दे या गोरखधंद्यात सहभागी असल्याच्या संशयावरून बुधवारी सायंकाळी पोलिसांची पथके वेगवेगळ्या भागात त्यांना शोधण्यासाठी धावपळ करत होती.
नागपूर : ७० हजारात दोन रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका वार्ड बॉयसह तिघांना सीताबर्डी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या प्रकरणात तिघांना ताब्यात घेऊन दोन रेमडेसिविर इंजेक्शन जप्त करण्यात आले. या तिघांचे आणखी काही साथीदार या गोरखधंद्यात सहभागी असल्याच्या संशयावरून बुधवारी सायंकाळी पोलिसांची पथके वेगवेगळ्या भागात त्यांना शोधण्यासाठी धावपळ करत होती.