Sale of Telangana stolen bicycles in Maharashtra;one bike theft arrested in kinwat | तेलंगणातील चोरीच्या दुचाकींची महाराष्ट्रात विक्री; किनवटमध्ये एकजण अटकेत
तेलंगणातील चोरीच्या दुचाकींची महाराष्ट्रात विक्री; किनवटमध्ये एकजण अटकेत

ठळक मुद्देमोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यताहैदराबाद पोलिसांनी किनवटमधून एकाला घेतले ताब्यात

किनवट (जि़ नांदेड) : तेलंगणातील दुचाकी चोरून त्याची विक्री किनवट तालुक्यात करणाऱ्या सलमान नावाच्या एका व्यक्तीला हैदराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ या इसमाकडून सात दुचाकी जप्त करण्यात आल्या असून किनवट येथील काहींच्या मदतीने तो हे रॅकेट चालवीत असल्याचा संशय आहे़ या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे़ 

तेलंगणातील सलमान नावाचा व्यक्ती तेथील टी़एस़ पासिंगच्या चोरीच्या मोटरसायकली स्थानिकांच्या मदतीने किनवट येथे विकत होता़ या प्रकरणाचा पर्दाफाश सोमवारी हैदराबाद पोलिसांनी किनवट येथे येऊन केला़ हैदराबाद पोलीस ठाण्याचे फौजदारअनिल कुमार यांच्या नेतृत्वाखालील पथक सोमवारी सकाळी किनवट येथे धडकले़या पथकाने स्थानिक किनवट पोलिसांच्या मदतीने एक नवीन बुलेट, पल्सर, स्कुटी व अन्य सात मोटारसायकली किनवट शहर व परिसरातून जप्त केल्या़

प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता
या तरुणाने आणखी काही मोटारसायकलींची अशाच पद्धतीने विक्री केल्याचे पुढे आले असून पोलीस त्याचाही कसून तपास करीत आहेत़ चोरीच्या मोटरसायकलची व्याप्ती मोठी असून, हैदराबादसह परिसरातून महागड्या गाड्यांची चोरी करून त्या या परिसरात विकल्या जात होत्या़ या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़  

Web Title: Sale of Telangana stolen bicycles in Maharashtra;one bike theft arrested in kinwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.