बनावट केस्ट्रॉल ऑइलची विक्री, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 19:06 IST2025-07-08T19:05:48+5:302025-07-08T19:06:00+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-३, डर्बी हॉटेल परिसरात राजा महादेव ऑइल नावाची लहान कंपनी आहे. याठिकाणी नामांकित केस्ट्रॉल कंपनीचा लागो वापरून त्याखाली बनावट ऑइल विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली...

बनावट केस्ट्रॉल ऑइलची विक्री, गुन्हा दाखल
उल्हासनगर : कॅम्प नं-३ येथील एका गोडाऊन मध्ये केस्ट्रॉल या नामांकित कंपनी ऑइलची विक्री करणाऱ्या त्रिकुटावर मध्यवर्ती पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून १ लाख ३९ हजार ८१० रुपये किंमतीचे एकूण ३४१ ऑइल बॉटल जप्त करून आधी तपास पोलीस करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-३, डर्बी हॉटेल परिसरात राजा महादेव ऑइल नावाची लहान कंपनी आहे. याठिकाणी नामांकित केस्ट्रॉल कंपनीचा लागो वापरून त्याखाली बनावट ऑइल विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रविवारी सायंकाळी ६ वाजता पोलिसांनी कंपनीवर धाड टाकून नामांकित कंपनीचा लोगो वापरून त्याखाली बनावट ऑइल विक्री करणाऱ्या भारत गुरुदासमल कुकरेजा, नरेश मिल्कीराम अलवानी व अजयकुमार चंद्रभान सिंग या तिघा विरोधात गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून १ लाख ३९ हजार ८१० रुपये किंमतीचे एकूण ३४१ बॉटल ऑइल जप्त केल्या. अधिक तपास पोलीस करीत आहेत.