Saki Naka Rape Case: साकीनाका बलात्कार प्रकरणाचा तपास १ महिन्यात; हेमंत नगराळेंचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 15:30 IST2021-09-11T15:29:43+5:302021-09-11T15:30:25+5:30
Mumbai Rape Case update: या गुन्ह्यात एकच आरोपी असून दुसरा आरोपी नाही म्हणून गुन्ह्यातील ३४ कलम काढलेलं आहे. पीडित महिला बेशुद्ध असल्याने तिचा जबाब घेता आला नाही.

Saki Naka Rape Case: साकीनाका बलात्कार प्रकरणाचा तपास १ महिन्यात; हेमंत नगराळेंचे आश्वासन
साकीनाकातील ती घटना दुर्दैवी आहे. ३:२० मिनिटांन पुट्याच्या कंपनीच्या सुरक्ष रक्षकाने पोलिस नियंत्रण कक्षालाही माहिती दिली. यानंतर पोलीस १० मिनिटांत घटनास्थळी पोहचले. राजावाडी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु केले. सुरक्षा रक्षकाने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी उत्तरप्रदेश जौनपूरच्या मोहन चौहानला अटक केली, असे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले.
मोहनच्या कपड्यांवर रक्ताचे डाग आढळून आले न्यायालयाने त्यांना २१ पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. ज्योत्स्ना रासम यांच्याकडे गुन्ह्याच्या तपासाची जबाबदारी देण्यात आली असून १ महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी देले आहे. तसेच हा गुन्हा फास्ट ट्रॅकवर चालवणार असल्याचे ते म्हणाले.
उपचारा दरम्यान या महिलेचा मृत्यू झाल्याने हत्येचं कलमही वाढवलेलं आहे. या गुन्ह्यात एकच आरोपी असून दुसरा आरोपी नाही म्हणून गुन्ह्यातील ३४ कलम काढलेलं आहे. पीडित महिला बेशुद्ध असल्याने तिचा जबाब घेता आला नाही. मात्र लवकरच वस्तूस्थिती समोर येईल, असेही ते म्हणाले.