वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 11:06 IST2025-08-01T11:05:46+5:302025-08-01T11:06:50+5:30

पतीच्या मृत्यूनंतर दोन मुलांची आई तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली. महिलेवर घरातून साडेतीन लाख रुपये रोख आणि मौल्यवान दागिने घेऊन पळून गेल्याचा आरोप आहे.

saharanpur widow mother absconded with lover carrying money jewelry leaving two minor children | वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."

फोटो - आजतक

उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीच्या मृत्यूनंतर दोन मुलांची आई तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली. महिलेवर घरातून साडेतीन लाख रुपये रोख आणि मौल्यवान दागिने घेऊन पळून गेल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेचा १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा मनीष वर्मा याने पोलीस स्टेशन गाठलं आणि न्याय मागितला आहे. मनीषने सांगितलं की, त्याच्या वडिलांचं काही काळापूर्वी आजारपणामुळे निधन झालं.

आईचे मुझफ्फरनगर येथील रहिवासी असलेल्या अनुज भाटी नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. ती रिहाना, शहजादी आणि नूरजहाँ नावाच्या महिलांसोबत पंजाबला गेली आणि तेथून ती अनुजसोबत पळून गेली. मनीषने आरोप आहे की, त्याच्या आईच्या या मैत्रिणींनी त्याला फक्त धमकीच दिली नाही तर मारहाणही केली. त्या शेतकरी संघटनेशी संबंधित आहेत, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध काहीही करता येणार नाही. 

आईने घरातील अनेक गोष्टी विकल्या आहेत आणि आता तिचा बॉयफ्रेंड वडिलांची जमीन आणि इतर संपत्ती हडप करू इच्छित आहे. घरात अन्नाची कमतरता आहे असा दावा मुलाने केला आहे  मनीष आणि त्याचा मोठा भाऊ आता एकटे पडले आहेत आणि सतत धमक्या येत असल्याने खूप घाबरले आहेत. मनीषने दिलेल्या माहितीनुसार, रेहाना, नूरजहाँ आणि शहजादी यांनी धमकी दिली आहे की, जर त्याने पोलिसांना तक्रार केली तर ते त्याला खोट्या प्रकरणात अडकवतील किंवा मारून टाकतील. 

मुलाने पोलिसांना सर्व काही सांगितलं आहे परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. हे प्रकरण गंगोह कोतवाली परिसरातील आहे, महिला २५ जुलैपासून बेपत्ता आहे. मुलाने त्याची आई आणि तिच्या बॉयफ्रेंडवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे जेणेकरून त्यांना न्याय मिळेल. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 
 

Web Title: saharanpur widow mother absconded with lover carrying money jewelry leaving two minor children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.