साध्वी प्रेम बाईसांच्या मृत्यूचं गूढ उकलणार; ३५ नमुने, DNA टेस्ट आणि SIT चा चक्रव्यूह!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 17:53 IST2026-02-05T17:52:32+5:302026-02-05T17:53:25+5:30

साध्वी प्रेम बाईसा यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, प्राथमिक तपासात पोलिसांना काही संशयास्पद गोष्टी आढळल्या आहेत.

Sadhvi Prem baisa will solve the mystery of Baisa's death; 35 samples, DNA tests and the maze of SIT! | साध्वी प्रेम बाईसांच्या मृत्यूचं गूढ उकलणार; ३५ नमुने, DNA टेस्ट आणि SIT चा चक्रव्यूह!

साध्वी प्रेम बाईसांच्या मृत्यूचं गूढ उकलणार; ३५ नमुने, DNA टेस्ट आणि SIT चा चक्रव्यूह!

राजस्थानमधील जोधपूर येथील प्रसिद्ध साध्वी प्रेम बाईसा यांच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण राज्य हादरले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने आता तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, या प्रकरणाला आता एक नवे आणि खळबळजनक वळण मिळाले आहे. साध्वींच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी आता चक्क डीएनए चाचणी आणि पॉलिग्राफ टेस्टचा आधार घेतला जाणार आहे.

काय आहे नेमके प्रकरण? 

साध्वी प्रेम बाईसा यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, प्राथमिक तपासात पोलिसांना काही संशयास्पद गोष्टी आढळल्या आहेत. त्यामुळे एफएसएलकडे साध्वींचे डीएनए सॅम्पल पाठवण्यात आले आहेत. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मते, साध्वींच्या शरीरातील नमुन्यांची तपासणी करून त्यामध्ये 'ह्युमन सीमन' आहे का, याचा शोध घेतला जात आहे. जर यामध्ये संशयास्पद काही आढळले, तर ज्या व्यक्तींवर पोलिसांना संशय आहे, त्यांच्या डीएनएशी जुळवून पाहिले जाईल.

वडिलांच्या नात्यावरही संशयाची सुई! 

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, साध्वींचे वडील हे त्यांचे खरे वडील आहेत की नाहीत, याबाबतही पोलिसांना शंका आहे. त्यामुळेच डीएनए टेस्टचा निर्णय घेण्यात आला आहे. जर विसरा अहवालात विषाचा अंश आढळला नाही, तर मात्र साध्वींचे वडील आणि त्यांचा केअर टेकर सुरेश या दोघांची 'पॉलिग्राफ टेस्ट' केली जाऊ शकते.

३५ नमुने आणि तपासाचा डोंगर 

एसआयटीने फॉरेन्सिक लॅबकडे तब्बल ३५ प्रकारचे नमुने पाठवले आहेत. तपास यंत्रणांच्या इतिहासातील ही एक मोठी संख्या मानली जात आहे. यामध्ये जेवणाची भांडी, आश्रमातील माती, बेडशीट, टॉवेल, कंगवा, डस्टबिनमधील कचरा आणि घटनास्थळी आढळलेली दोन इंजेक्शन्स व औषधांच्या बाटल्यांचा समावेश आहे. साध्वींना खरोखरच दमा होता का? याची शहानिशा करण्यासाठी त्यांच्या जुन्या औषधांचीही तपासणी केली जात आहे.

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची चौकशी 

एसआयटी प्रमुख एसीपी छवी शर्मा यांच्या नेतृत्वाखालील टीमने दोन दिवसांपूर्वी त्या खासगी रुग्णालयाला भेट दिली, जिथे साध्वींना सुरुवातीला नेण्यात आले होते. रुग्णालयाचे डॉ. प्रवीण कुमार जैन यांनी सांगितले की, "काही महिन्यांपूर्वी साध्वी सर्दी-खोकल्याच्या उपचारासाठी आल्या होत्या, मात्र त्यांना दमा होता की नाही, हे निश्चित सांगता येणार नाही."

पुढील ७ ते १० दिवस महत्त्वाचे 

फॉरेन्सिक लॅबला मंगळवारी हे सर्व नमुने प्राप्त झाले आहेत. रिपोर्ट येण्यासाठी साधारण ७ ते १० दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या अहवालातूनच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. सध्या एसआयटीने १० हून अधिक लोकांची चौकशी केली असून, लवकरच या प्रकरणाचा उलगडा होण्याची चिन्हे आहेत.

Web Title : साध्वी की मौत का रहस्य खुलेगा: डीएनए टेस्ट और एसआईटी जांच

Web Summary : राजस्थान में साध्वी प्रेम बाईसा की संदिग्ध मौत की जांच जारी है। सच्चाई का पता लगाने के लिए डीएनए और पॉलीग्राफ टेस्ट किए जाएंगे। फोरेंसिक विश्लेषण के लिए नमूने भेजे गए। पुलिस संभावित जहर और साध्वी के पितृत्व पर सवाल उठाते हुए जांच कर रही है, कई व्यक्तियों से पूछताछ जारी है।

Web Title : Mystery of Sadhvi's Death to Unravel: DNA Tests and SIT Probe

Web Summary : The suspicious death of Sadhvi Prem Baisa in Rajasthan is under investigation. DNA tests and polygraph tests will be used to uncover the truth. Samples were sent for forensic analysis. Police are investigating possible foul play, including potential poisoning and questioning the Sadhvi's parentage, with multiple individuals being interrogated.