Sachin Vaze : आलिशान कार्सपाठोपाठ सचिन वाझेंची स्पोर्ट्स बाईक दमणमधून NIA घेतली ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 17:29 IST2021-04-05T17:28:39+5:302021-04-05T17:29:32+5:30
Sachin Vaze :दमणमधून ही बाईक NIAने जप्त केली.

Sachin Vaze : आलिशान कार्सपाठोपाठ सचिन वाझेंची स्पोर्ट्स बाईक दमणमधून NIA घेतली ताब्यात
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी स्फोटक आणि मनसुख हिरेन प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) सचिन वाझे यांची सखोल चौकशी सुरु आहे. वाझेंच्या चौकशीत दिवसेंदिवस खळबळजनक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत याप्रकरणात अनेक आलिशान कार NIA ने जप्त केल्या आहेत. त्यानंतर आता याप्रकरणात स्पोर्टस बाईक देखील NIA ने जप्त केल्याने नव्या दुचाकीची एन्ट्री झाली आहे. दमणमधून ही बाईक NIAने जप्त केली.
ही स्पोर्टस बाईक मीना जॉर्ज या मिस्ट्री वुमनच्या नावावर आहे. ही स्पोर्टस बाईक बेनेली कंपनीची आहे. या स्पोर्टस बाईकची किंमत जवळपास 7 लाख 16 लाख इतकी आहे. काही दिवसांपूर्वी NIAने मीना जॉर्ज या महिलेला मीरा रोड येथून ताब्यात घेतले होते. ट्रायडंट हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मीना जॉर्ज सचिन वाझे यांच्यासोबत दिसून आल्याचे सांगितले जाते. त्यावेळी त्यांच्या हातात पैसे मोजण्याचे मशीन होते, असेही NIA च्या सूत्रांनी सांगितले आहे.
Sachin Vaze: NIA च्या हाती महत्त्वाची कागदपत्रं; अधिकाऱ्यांची नावं उघड, महिन्याला लाच म्हणून मिळायची मोठी रक्कम
Sachin Vaze: आरशात नव्हे तर CCTV मध्ये सचिन वाझेनं स्वत:ला पाहिलं; पोलीस कंट्रोल रुममध्ये ‘त्या’ दिवशी काय घडलं?
आज सकाळी टेम्पोमधून ही दुचाकी NIAच्या कार्यालयात आणण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत आठ चार चाकी वाहने आणि एक दुचाकी वाहन जप्त करण्यात आली आहे. NIA च्या पथकांनी आतापर्यंत एकूण नऊ वाहने जप्त केली आहे. या वाहनांचा उपयोग वाझे किंवा वाझेंच्या सहकाऱ्यांकडून करण्यात आल्याचा ‘NIA’चा संशय आहे.