Sachin Vaze: NIA च्या हाती महत्त्वाची कागदपत्रं; अधिकाऱ्यांची नावं उघड, महिन्याला लाच म्हणून मिळायची मोठी रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 10:09 AM2021-04-05T10:09:30+5:302021-04-05T10:55:27+5:30

यातील एका कागदपत्रात कार्यालय, अधिकाऱ्यांच्या नावासह त्यांच्या पदाचा उल्लेख आहे, प्रत्येक नावासमोर रक्कम लिहिण्यात आली आहे

Sachin Vaze: Important documents in the hands of NIA; Names of officials revealed | Sachin Vaze: NIA च्या हाती महत्त्वाची कागदपत्रं; अधिकाऱ्यांची नावं उघड, महिन्याला लाच म्हणून मिळायची मोठी रक्कम

Sachin Vaze: NIA च्या हाती महत्त्वाची कागदपत्रं; अधिकाऱ्यांची नावं उघड, महिन्याला लाच म्हणून मिळायची मोठी रक्कम

googlenewsNext
ठळक मुद्देनिलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्या तपासादरम्यान दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे असणाऱ्या एका क्लबवर छापा टाकण्यात आलाआवश्यकता भासल्यास ही कागदपत्रे NIA कडून आयकर खात्याला किंवा सीबीआयला सोपवण्यात येणार आहेत.या क्लबमध्ये सचिन वाझे सारखा येत जात होता, याच ठिकाणी त्याने क्रिकेट बुकी नरेश गौर आणि सहआरोपी विनायक शिंदेला नोकरीला लावलं होतं.

मुंबई – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी(Mukesh Ambani Bomb Scare) भरलेली गाडी सापडली होती, त्यानंतर या गाडी मालकाचा मृतदेह सापडला होता, या दोन्ही प्रकरणाचा तपास NIA करत असून त्यांच्या हाती काही महत्त्वाची कागदपत्रं सापडली आहेत. यात मुंबई पोलीस दल आणि प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची संशयास्पद नावं आहेत, या लोकांना लाच म्हणून दर महिन्याला पैसे दिले जायचे याचा उल्लेख आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्या तपासादरम्यान दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे असणाऱ्या एका क्लबवर छापा टाकण्यात आला, याठिकाणी अनेक कागदपत्रे सापडली, NIA याचा शोध घेत आहे, ७ एप्रिलपर्यंत सचिन वाझे NIA कोठडीत आहे. या प्रकरणात NIA ने क्लबचे मालक आणि अन्य लोकांकडे स्पष्टीकरण मागितलं आहे. आवश्यकता भासल्यास ही कागदपत्रे NIA कडून आयकर खात्याला किंवा सीबीआयला सोपवण्यात येणार आहेत.

आरशात नव्हे तर CCTV मध्ये सचिन वाझेनं स्वत:ला पाहिलं; पोलीस कंट्रोल रुममध्ये ‘त्या’ दिवशी काय घडलं?

क्लबमध्ये सहकाऱ्यांना लावली होती नोकरी

अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, या क्लबमध्ये सचिन वाझे सारखा येत जात होता, याच ठिकाणी त्याने क्रिकेट बुकी नरेश गौर आणि सहआरोपी विनायक शिंदेला नोकरीला लावलं होतं. हे दोघंही NIA च्या ताब्यात आहेत.

कागदपत्रात काय दडलंय?

यातील एका कागदपत्रात कार्यालय, अधिकाऱ्यांच्या नावासह त्यांच्या पदाचा उल्लेख आहे, प्रत्येक नावासमोर रक्कम लिहिण्यात आली आहे, ज्यात महिन्यानुसार तारीख आहे. ही रक्कम संबंधित अधिकाऱ्यांना लाच म्हणून दर महिन्याला पोहचवली जात होती असा अधिकाऱ्यांना संशय आहे.

...तर मोठा मासा हाती लागणार

सचिन वाझे चौकशीमध्ये काही वेगळी धक्कादायक माहिती देत आहे, एनआयए मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्याने कोर्टाच्या निदर्शनास ही बाब आणली आहे. त्याच्या सांगण्यानुसार कोर्टाने एनआयएला पडताळणी करण्यास सांगितल्यास यामध्ये वरिष्ठ अधिकारी व अन्य व्यक्तींना चौकशीला पाचारण करावे लागणार आहे. त्यातून अनेक बडे मासे बाहेर येण्याची शक्यता आहे.

‘ते’ चौघं NIA च्या रडारवर

एका पोलीस उपायुक्तासह दोन निरीक्षक व एक माजी अधिकारी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) रडारवर आहेत. या चौघांचे त्याच्या वसुलीच्या आर्थिक व्यवहारात संबंध असल्याचे माहिती मिळाल्याचे समजते. मात्र स्कॉर्पिओ आणि हत्येत त्यांच्या सहभागाबद्दल अजून पुरावे मिळालेले नाहीत. त्यातील त्यांची भूमिका तपासण्यात येत असून, आवश्यकता भासल्यास लवकरच त्यांना ताब्यात घेतले जाईल, असे सूत्राकडून सांगण्यात आले. चारहीजण व वाझेमध्ये ठाणे कनेक्शनही ही एक बाब साधर्म्य आहे. चौघांपैकी पोलीस उपायुक्त व एक निरीक्षक मुंबईतील, तर उर्वरित ठाण्यातील आहेत. तिघांकडे प्राथमिक टप्प्यात चौकशी करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Web Title: Sachin Vaze: Important documents in the hands of NIA; Names of officials revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.