शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
3
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
4
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
5
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
6
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
7
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
8
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
9
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
10
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
11
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
12
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
13
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
14
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
17
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
18
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
19
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
20
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये ५० लाख रुपयांचा गुटखा जप्त, गुन्हे शाखेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 02:19 IST

गुन्हे शाखा कक्ष दोनच्या पथकाने कामोठेमध्ये गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडला. तब्बल ५० लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून चालकाला ताब्यात घेतले आहे.

पनवेल : गुन्हे शाखा कक्ष दोनच्या पथकाने कामोठेमध्ये गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडला. तब्बल ५० लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून चालकाला ताब्यात घेतले आहे.गोवा येथून मुंबई बाजूकडे गुटख्याचे १०० हून अधिक बोचकी आयशर टेम्पोमधून नेली जात असल्याची खबर गुन्हे शाखा कक्ष २ च्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पोपेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप गायकवाड, शरद ढोले, प्रफुल्ल मोरे, संजय पाटील, सुनील कुदळे आदीच्या पथकाने सापळा रचून कामोठे परिसरात आयशर टेम्पो क्र. एमएच-४६-बीएफ-१४१३ अडवला. या टेम्पोतून जवळपास ५० लाखांचा असलेला गुटखा टेम्पोसह हस्तगत केला आहे. याबाबतची माहिती अन्न व औषध प्रशासन विभाग पेण यांना दिली असून, त्यांचेसुद्धा पथक घटनास्थळी दाखल झाले होते.या प्रकरणी चालकाला ताब्यात घेतले असून, गुटख्याची मोजदाद करून गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. या प्रकरणामध्येकोणाचा समावेश आहे. कोठून गुटखा आणला होता व कोणाला विकला जाणार होता, याचा पोलीस तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई