नाशिकमध्ये चार सोन्याच्या दुकानांवर दरोडा, पोलिसांकडून तपास सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 09:57 IST2021-01-08T09:56:39+5:302021-01-08T09:57:36+5:30

Crime News : याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Robbery at four gold shops in Nashik, police investigating | नाशिकमध्ये चार सोन्याच्या दुकानांवर दरोडा, पोलिसांकडून तपास सुरू 

नाशिकमध्ये चार सोन्याच्या दुकानांवर दरोडा, पोलिसांकडून तपास सुरू 

ठळक मुद्देपहाटे साडे चारच्या सुमारास लोखंडी रॉडच्या साह्याने चोरट्यांनी दुकानांचा सेंटर लॉक तोडत दुकानांमध्ये प्रवेश करत सोन्यावर डल्ला मारला.

पिंपळगाव बसवंत (नाशिक) - पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शहरातील चार सराफा दुकानांवर दरोडा टाकत लाखों रुपयांच्या सोन्यावर डल्ला मारला. याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परिसरातील मेनरोड वेशीलगत असलेले विलास नारायण बिरारी यांची दोन दुकाने बिरारी ज्वेलर्स तर भगवान श्रीराम राठी यांचे श्रीराम ज्वेलर्स आणि जुना आग्रा महामार्गावरील अथर्व वैभव खरोटे अलंकार ज्वेलर्स अशा चार दुकानांमध्ये सोन्याची चोरी झाली आहे. 

पहाटे साडे चारच्या सुमारास लोखंडी रॉडच्या साह्याने चोरट्यांनी दुकानांचा सेंटर लॉक तोडत दुकानांमध्ये प्रवेश करत सोन्यावर डल्ला मारला. याबाबत पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.
 

Web Title: Robbery at four gold shops in Nashik, police investigating