पोलीस असल्याची बतावणी करून दुकलीले लांबवले सोन्याच्या बांगड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 17:41 IST2021-08-10T17:40:38+5:302021-08-10T17:41:26+5:30
Pretending as Police looted gold : ७ तोळे वजनाच्या बांगड्या दोघा भामट्याने हातोहात लांबविल्याची घटना हिरावाडीरोडवर मंगळवारी दुपारच्या सुमाराला घडली.

पोलीस असल्याची बतावणी करून दुकलीले लांबवले सोन्याच्या बांगड्या
नाशिक : पोलिस असल्याची बतावणी करून हातातील ७ तोळे वजनाच्या बांगड्या दोघा भामट्याने हातोहात लांबविल्याची घटना हिरावाडीरोडवर मंगळवारी दुपारच्या सुमाराला घडली.
हिरावाडी रोड ओमनगर खोडीयार निवास येथे राहणाऱ्या सुशिला सुरेश गुजराती हया दुपारी साडे बारा वाजता मंदिरातून घरी येत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने मी पोलीस आहे तुमच्या हातातील बांगड्या काढून पिशवीत ठेवा असे सांगितले त्यानंतर गळ्यातील सोनसाखळी काढून ठेवण्यास सांगून साखळी काढून घेतली आणि ती पिशवीत न ठेवता हातात ठेवली, सोनसाखळी हातात असल्याचे गुजराती यांच्या लक्षात येताच चोरट्यांनी बांगड्या ठेवण्याचे बहाणा करून बांगड्या घेऊन पलायन केले.
आईने उशीने तोंड दाबून मुलाचा घेतला जीव अन् स्वतःही घेतला गळफास लावूनhttps://t.co/38IuMHPtRv
— Lokmat (@MiLOKMAT) August 10, 2021