लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 18:44 IST2025-07-03T18:43:59+5:302025-07-03T18:44:46+5:30
लग्नाच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह टोळीतील पाच जणांना अटक केली आहे.

फोटो - nbt
मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यातील चाचरिया पोलीस स्टेशन परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नाच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह टोळीतील पाच जणांना अटक केली आहे. एका महिलेने तिच्याच पती भाऊ असल्याचं खोटं सांगितलं आणि दुसरं लग्न केलं. विशेष म्हणजे तिच्या पतीनेच हे लग्न लावलं आणि नंतर रोख रक्कम आणि दागिने घेऊन पसार झाले.
चाचरिया पोलीस स्टेशनचे प्रभारी संजय शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरदड येथील रहिवासी असलेली आसमां, तिचा पती रामदास आणि खरगोन जिल्ह्यातील अंबा खेडा येथील रहिवासी कैलाश चौहान, सिरवेल येथील इलाम सिंग बर्डे आणि हिरालाल बर्डे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं.
अलिराजपूर जिल्ह्यातील सोरवा पोलीस स्टेशन परिसरातील वरदला येथील रहिवासी वेस्ता कलेश आपला भावाचं लग्न होत नसल्याने नाराज होता. तो दलाल कैलाशला भेटला. गुजरातमध्ये मजूर म्हणून काम करत असताना त्याने लग्नासाठी एका मुलीबद्दल सांगितलं होतं. त्यानंतर नान सिंहचं लग्न आदिवासी रितीरिवाजांनुसार आसमां नावाच्या मुलीशी झालं आणि १.७ लाख रुपये घेण्यात आले.
या लग्नात आसमांचा पती रामदास तिचा भाऊ बनला आणि पाठवणीच्या वेळी ढसाढसा रडत होता. तर एकाने वडिलांची भूमिका साकारली. या लग्नासाठी हिरालालने त्याचं घर उपलब्ध करून दिलं होतं.पोलिसांनी सांगितलं की, कमी वेळेत जास्त पैसे कमविण्याच्या इच्छेने ही टोळी तयार झाली होती आणि या प्रकारची फसवणूक करण्यात आली. या टोळीने आणखी अनेक लोकांना फसवलं असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.