रिया चक्रवर्ती अजूनही पोलिसांच्या रडारवर, जबाबाची पडताळणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 06:48 IST2020-07-09T06:48:19+5:302020-07-09T06:48:26+5:30

पोलीस या प्रकरणात सर्व बाजूंनी चौकशी करत आहेत. सर्व जबाब नोंद झाल्यानंतर त्याचा निष्कर्ष आणि रियाने दिलेला जबाब याची पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे अद्याप तिला क्लीनचिट देण्यात आली नसून, ती पोलिसांच्या रडारवर असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Riya Chakraborty is still on the police radar, verifying the answer | रिया चक्रवर्ती अजूनही पोलिसांच्या रडारवर, जबाबाची पडताळणी सुरू

रिया चक्रवर्ती अजूनही पोलिसांच्या रडारवर, जबाबाची पडताळणी सुरू

मुंबई : सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणी चौकशी करणाऱ्या पोलिसांनी आतापर्यंत तीसहून अधिक जबाब नोंदविले आहेत. सुशांतच्या अत्यंत जवळ असणाºया अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर पोलिसांचे अधिक लक्ष आहे. तिची कसून चौकशी सुरू असून अजूनही ती पोलिसांच्या रडारवर असल्याचे समजते.
वांद्रे पोलिसांनी रियाची जवळपास नऊ ते दहा तास चौकशी केली होती. त्या दरम्यान तिचा जबाब नोंदविण्यात आला. सुशांतबाबत अनेक महत्त्वाच्या बाबी तिला विचारण्यात आल्या होत्या. त्यानंतरही रियाची फोनवरून तसेच बºयाचदा पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केली जात असल्याचे तिच्या वडिलांचे म्हणणे आहे.
पोलीस या प्रकरणात सर्व बाजूंनी चौकशी करत आहेत. सर्व जबाब नोंद झाल्यानंतर त्याचा निष्कर्ष आणि रियाने दिलेला जबाब याची पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे अद्याप तिला क्लीनचिट देण्यात आली नसून, ती पोलिसांच्या रडारवर असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
सुशांतने १४ जूनला आत्महत्या केली त्याच्या बारा दिवस आधी रिया त्याला सोडून निघून गेली होती. दोघांचे भांडण झाल्यानंतर सुशांतनेच तिला जायला सांगितल्याचे तिने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले ंआहे. याआधी मालाडच्या ज्या घरात ते राहत होते ते घर झपाटलेले होते, असेही तिने सांगितल्याचे समजते. मात्र शेजाऱ्यांसोबत झालेल्या वादामुळे त्यांनी हे घर सोडल्याचे वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केले होते.

दोघे लग्न करणार असल्याची चर्चा

सुशांत आणि रिया डिसेंबर, २०२०मध्ये लग्न करणार होते अशी चर्चा आहे. त्याच्या तीनपैकी दोन कंपन्यांचे मालक रिया आणि तिचा भाऊ असल्याची माहिती आहे. त्यादृष्टीनेही पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Riya Chakraborty is still on the police radar, verifying the answer