खळबळजनक! गर्लफ्रेंसाठी बायकोला सोडलं, संपत्ती विकली; शेवटी तिचीची हत्या केली, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 12:32 IST2026-02-03T12:32:06+5:302026-02-03T12:32:45+5:30

प्रीती ही घटस्फोटीत होती आणि गेल्या काही काळापासून सुरेश गुप्तासोबत रिलेशनशिप होती.

rishikesh man for whom he left home shot her in chest lover arrested in preeti rawat murder case | खळबळजनक! गर्लफ्रेंसाठी बायकोला सोडलं, संपत्ती विकली; शेवटी तिचीची हत्या केली, कारण...

फोटो - tv9hindi

उत्तराखंडमधील ऋषिकेशमध्ये प्रीती रावत (३२) हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश आलं आहे. आरोपी सुरेश गुप्ता याला पोलिसांनी सोमवारी उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील छुटमलपूर येथून अटक केली. प्रीती रावत ऋषिकेशमधील शिवाजी नगर भागात भाड्याच्या खोलीत एकटी राहत होती आणि ऋषिकेश एम्स (AIIMS) मध्ये सहाय्यक म्हणून कार्यरत होती. प्रीती ही घटस्फोटीत होती आणि गेल्या काही काळापासून सुरेश गुप्तासोबत रिलेशनशिप होती.

शनिवारी उशिरा रात्री सुरेशने प्रीतीची गोळ्या झाडून हत्या केली आणि त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस दलात खळबळ उडाली होती. प्रीतीचे वडील बच्चन सिंह रावत यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुरेशविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला होता.

लग्नासाठी पत्नीला दिला घटस्फोट

पोलिसांच्या प्राथमिक तपासात धक्कादायक खुलासे झाले आहेत. सुरेश गुप्ताला प्रीतीशी लग्न करायचं होतं. प्रीतीशी लग्न करण्यासाठी त्याने अवघ्या चार महिन्यांपूर्वी आपल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. इतकंच नाही तर प्रीतीच्या सांगण्यावरून त्याने हरिद्वारमधील लक्सर येथील आपली वडिलोपार्जित संपत्तीदेखील विकली होती. ही मालमत्ता विकल्यानंतर मिळालेल्या पैशातून तो ऋषिकेशमध्येच घर शोधत होता, जेणेकरून तो प्रीतीसोबत राहू शकेल.

दोघांमध्ये खटके उडू लागले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेशला ऋषिकेशमध्ये चांगल्या ठिकाणी घर किंवा मालमत्ता खरेदी करता येत नव्हती. याच कारणावरून प्रीती आणि सुरेश यांच्यात वाद सुरू झाले. सुरेशला असं वाटू लागले की त्याने प्रीतीसाठी आपलं घर आणि संपत्ती सर्वकाही पणाला लावलं, परंतु त्या बदल्यात त्याला जी अपेक्षा होती ती पूर्ण झाली नाही. याच रागातून आणि वादातून सुरेशने प्रीतीला कायमचं संपवण्याचा भयानक निर्णय घेतला.
 

Web Title: rishikesh man for whom he left home shot her in chest lover arrested in preeti rawat murder case