विंदू दारासिंगच्या पत्नीचा मोबाईल गेला चोरीला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 16:53 IST2019-05-11T16:51:48+5:302019-05-11T16:53:36+5:30

रिक्षाचालकाच्या रिक्षाचा फोटो ट्विटही करत मुंबई पोलीस आणि मुंबईच्या ट्रॅफिक पोलिसांना टॅग केलं आहे. 

The Rickshaw driver robbed Vindu Dara Singh's wives mobile | विंदू दारासिंगच्या पत्नीचा मोबाईल गेला चोरीला 

विंदू दारासिंगच्या पत्नीचा मोबाईल गेला चोरीला 

ठळक मुद्देअभिनेता विंदू दारासिंग याच्या पत्नीचा मोबाईल एका अनोळखी रिक्षा चालकाने हिसकावल्याचा प्रकार पुढे आला आहे.  अज्ञात रिक्षाचालकाने विंदूच्या पत्नीचा मोबाईल हिसकावून पळ काढला.

मुंबई - आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी गोत्यात सापडलेला आणि बिग बाॅस सीजन ३ चा विजेता अभिनेता विंदू दारासिंग याच्या पत्नीचा मोबाईल एका अनोळखी रिक्षा चालकाने हिसकावल्याचा प्रकार पुढे आला आहे.  याप्रकरणी विंदूने स्वतःच्या ट्विटर अकाऊन्टवर मोबाईल चोरी केलेल्या रिक्षाचालकाच्या रिक्षाचा फोटो ट्विटही करत मुंबई पोलीस आणि मुंबईच्या ट्रॅफिक पोलिसांना टॅग केलं आहे. 

विंदूची पत्नी अंधेरी परिसरात रस्त्यातून जात असताना हा प्रकार घडला. अज्ञात रिक्षाचालकाने विंदूच्या पत्नीचा मोबाईल हिसकावून पळ काढला. वेळीच विंदूने नजीकच्या पोलिसांकडे मदत मागितली. पोलिसांनी सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने रिक्षा चालकाच्या रिक्षाचा नंबर मिळवला. विंदूने या रिक्षाचा फोटो ट्विटरवर ट्विट करत, मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलिसांकडे मदत मागितली आहे.

Web Title: The Rickshaw driver robbed Vindu Dara Singh's wives mobile