कोरेगाव पार्कमध्ये रिक्षाचालकाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 21:29 IST2020-07-01T21:28:32+5:302020-07-01T21:29:00+5:30

घरी जाणा-या एका रिक्षाचालकाचा हल्लेखोरांनी कोयत्याने वार करुन खुन केल्याचे समोर आले आहे.

Rickshaw driver Murder in Koregaon Park | कोरेगाव पार्कमध्ये रिक्षाचालकाचा खून

कोरेगाव पार्कमध्ये रिक्षाचालकाचा खून

 पुणे -  कोरेगाव पार्क येथे घरी जाणा-या एका रिक्षाचालकाचा हल्लेखोरांनी कोयत्याने वार करुन खुन केल्याचे समोर आले आहे. राहुल विनायक जगताप (वय ४७, राक़वडेवस्ती लेन नंबर ५, कोरेगाव पार्क) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे.
राहुल हे रिक्षाचालक आहे. रिक्षा व्यवसाय करुन ते नेहमीप्रमाणे रात्री दहा वाजता घरी जात होते. कोरेगाव पार्कमधील रेल्वेरुळाच्या शेजारील रस्त्यावरुन ते रिक्षा घेऊन लेन नंबर ५ मधून जात असताना अचानक हल्लेखोरांनी त्यांना अडविले व त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. राहुल रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. ही माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत त्याच्या नातेवाईकांनी राहुल यांना ससून रुग्णालयात नेले होते. मात्र, डॉक्टर तपासणीपूर्वीच राहुल यांचा मृत्यु झाला होता. या घटनेची माहिती मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस अधिकारी रात्रीच घटनास्थळी पोहचले. त्यांनी तपासाच्या दृष्टीने कोरेगाव पार्क पोलिसांना सूचना दिल्या आहेत. राहुल यांचा कोणाशी वाद होता का, त्यांची कोणाशी भांडणे झाली होती का याची माहिती घेण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे.

Web Title: Rickshaw driver Murder in Koregaon Park