शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हा दाखल केल्यानंतरही कारवाई न केल्याने नैराश्येतून रिक्षाचालकाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 15:03 IST

तुझ्या मुलाला व मानसिक आजारी असलेल्या मुलीला संपवितो, अशी दिली होती धमकी...

ठळक मुद्देपुण्यातील जनवाडीमधील प्रकारदारु विक्री सुरु झाल्यावर जनवाडी,गोखलेनगर भागात भांडणाच्या प्रकारात वाढ

पुणे : किरकोळ कारणावरुन बेदम मारहाण केल्याची तक्रार पोलिसांनी दाखल करुन घेतली. मात्र, काही कारवाई न केल्याने ते येता जाता त्यांना टोमणे मारत होते. तुझ्या मुलाला व मानसिक आजारी असलेल्या मुलीला संपवितो, अशी धमकी देत होते. मारहाण करुनही पोलिसांनी काहीही कारवाई न केल्याने नैराश्येतून रिक्षाचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. जनवाडी येथील जनता वसाहतीत मंगळवारी रात्री हा प्रकार घडला.रामदास मारुती कुसाळकर (वय ५१, रा. धर्मनगर, सोमेश्वर मंदिराजवळ, जनवाडी) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी विकी कुसाळकर याच्यासह ६ जणांना ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी कुसाळकर यांच्या नातेवाईकांनी सांगितले की, रामदास कुसाळकर हे भाड्याने रिक्षा घेऊन चालवत होते. बाबु कुसाळकर यांचे धर्मनगरमध्ये ऑफिस आहे. तेथे ते बसत असत. ऑफिसमध्ये जाता येऊ नये, म्हणून कोणीतरी दारासमोर घाण टाकली होती. शनिवारी याबाबत बाबु याने विकी याच्याकडे विचारणा केल्यावर त्याने व त्याच्या साथीदारांनी बाबु, देवीदास व सागर यांना बेदम मारहाण केली. त्यांनी जनवाडी पोलीस चौकीत तक्रार दिली. तेव्हा पोलिसांनी दोघांवरच गुन्हे दाखल केले. परंतु, पुढे कोणतीही कारवाई केली नाही. दुसऱ्या दिवशी त्या टोळक्याने त्यांना जाता येताना पुन्हा चिडविण्यास सुरुवात केली. इतका सर्व प्रकार होऊन पोलिसांनी त्यांच्यावर काही कारवाई केली नाही. उलट ते आणखी चिडवू लागले. तसेच मुलाला व मुलीला संपवितो, अशी धमकी देऊ लागले. लॉकडाऊनमुळे घरी असल्याने त्याचा परिणाम त्यांच्यावर झाला. मंगळवारी रात्री ते वरच्या खोलीत गेले. तेथे त्यांनी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ आतमध्ये असल्याने शेजारच्यांनी आवाज दिल्यावरही त्यांनी दरवाजा उघडला नाही. तेव्हा दरवाजा तोडून आत प्रवेश केला तर त्यांनी आत्महत्या केल्याचे आढळून आले.याबाबत चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी सांगितले की, शनिवारी त्यांच्यात भांडणे झाल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल केला होता. त्यात रामदास कुसाळकर हे यात फिर्यादी अथवा आरोपीही नव्हते. मात्र, त्यांचे नातेवाईक होते. यापूर्वी त्यांना, त्यांच्या मुलीला टोमणे मारले जात असल्याची तक्रार त्यांनी दिली नव्हती. याबाबत पोलिसांनी ६ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर तसेच दारु विक्री सुरु झाल्यावर जनवाडी,गोखलेनगर भागात भांडणाच्या प्रकारात वाढ झाली आहे. मात्र, पोलिसांकडून त्यावर कारवाई केली जात नसल्याच्या तक्रारी आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूauto rickshawऑटो रिक्षाPoliceपोलिस