बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पीडित महिलेवर पुन्हा बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 13:42 IST2019-08-27T13:40:37+5:302019-08-27T13:42:23+5:30

चाकूचा धाक दाखवून तिला रिक्षातून वाकड येथील लॉजवर जबरदस्तीने नेले. तिथे तिच्यावर पुन्हा अत्याचार केला.

Repeated rape on women due to registred crime given return | बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पीडित महिलेवर पुन्हा बलात्कार

बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पीडित महिलेवर पुन्हा बलात्कार

पिंपरी : बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपीने पीडित महिलेवर पुन्हा बलात्कार केला. गुन्हा मागे घेण्यासाठी चाकूचा धाक दाखवून अत्याचार केला. ही घटना वाकड येथे घडली.
आबा मधुकर बर्फे (वय ३६, रा. गणेश कॉलनी, भोसरी) असे दुसºयांदा बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत ३७ वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ फेब्रुवारी २०१८ रोजी दिघी पोलीस ठाण्यात पीडित महिलेने आरोपीच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला. ही फिर्याद मागे घेण्यासाठी आरोपी वेळोवेळी पीडित महिलेचा पाठलाग करीत होता.
  पीडित महिला ३ ऑगस्ट रोजी बस स्टॉपवर उभी असताना आरोपीने पीडित महिलेच्या कमरेला चाकू लावला. चाकूचा धाक दाखवून तिला रिक्षातून वाकड येथील लॉजवर जबरदस्तीने नेले. तिथे तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. तसेच या प्रकाराबाबत कुणालाही न सांगण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Repeated rape on women due to registred crime given return