शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

Remdesivir Injection : रेमडेसिविर काळाबाजार प्रकरणी मिरज शासकीय रुग्णालयातील कर्मचारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2021 12:49 PM

Crime News : शासकीय कोविड रुग्णालयातील अधिपरिचारकच या इंजेक्शनचा काळाबाजार करताना पोलिसांच्या जाळ्यात सापडल्याने खळबळ उडाली होती.

सांगली : कोरोनाबाधितांवर उपचारासाठी प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या मिरज शासकीय रुग्णालयातील अधिपरिचारक सुमित सुधीर हुपरीकर यास निलंबित करण्यात आले आहे. (Remdesivir Injection: Employees of Miraj Government Hospital suspended in Remdesivir black market case)

रुग्णांसाठी दिलेले रेमडेसिविर इंजेक्शन बाहेर तब्बल ३० हजार रुपयांना विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. यात मिरज शासकीय रुग्णालयातील कर्मचारी सुमित सुधीर हुपरीकर (वय ३२, रा. समृद्धीनगर, विश्रामबाग, सांगली) याच्यासह खासगी प्रयोगशाळा तंत्रज्ञ दाविद सतीश वाघमारे (वय २५, रा. कुपवाडरोड, विजयनगर, सांगली) यांचा समावेश होता.

आता रुग्णालय प्रशासनाने त्यास निलंबित केले आहे. शासकीय कोविड रुग्णालयातील अधिपरिचारकच या इंजेक्शनचा काळाबाजार करताना पोलिसांच्या जाळ्यात सापडल्याने खळबळ उडाली होती. त्याला या कामात विश्रामबाग येथील खासगी प्रयोगशाळेत काम करणारा त्याचा मित्र दाविद हा त्याला मदत करत होता.

रविवार दि. २५ रोजी सकाळी संशयित दोघेही रेमडेसिविर इंजेक्शन घेऊन विलिंग्डन महाविद्यालयासमोर थांबले होते. याचवेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले व तपासणी केली असता, त्यांच्याजवळ रेमडेसिविरची एक कुपी आढळून आली. 

यावेळी त्यांनी एक इंजेक्शन यापूर्वी आम्ही ३० हजार रुपयांना विकले असून, हेही इंजेक्शन ३० हजार रुपयांना विकणार होतो, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली होती.  यानंतर प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा सुमित हुपरीकर यास निलंबित करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस