शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

संचारबंदीदरम्यान नातेवाईकाची गाडी अडवली; भाजपा आमदार प्रशांत बंब यांनी घातला पोलिसांशी वाद 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 7:26 PM

Argument between police and MLA Bamb : औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघाचे आमदार असलेल्या प्रशांत बंब यांनी पोलिसांना गाडी का अडवली अशी विचारणा केल्यानंतर वाद वाढला.

ठळक मुद्देया तरुणाने कोरोना रुग्ण असलेल्या नातेवाईकाला काही वस्तू देण्यासाठी जात असल्याचं सांगितलं. मात्र, पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी त्याला आणखी विचारपूस केली आणि त्याच्यावर कारवाई केली.

औरंगाबादमध्ये भाजपाचे आमदारप्रशांत बंब आणि पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला. कारण संचारबंदीमध्ये बंब यांच्या नातेवाईकाची गाडी अडवली. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघाचे आमदार असलेल्या प्रशांत बंब यांनी पोलिसांना गाडी का अडवली अशी विचारणा केल्यानंतर वाद वाढला.

ब्रेक द चेनअंतर्गत संपूर्ण राज्यात सरकारनं संचारबंदी आणि कडक निर्बंध लावलेले आहेत. त्यानुसार राज्यात  कलम १४४ लागू केलेलं असल्यानं विनाकारण शहरात फिरण्यास सर्वांना बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार पोलीस शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी करून लोकांनी विनाकारण फिरू नये म्हणून कारवाई करत आहेत. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी औरंगाबाद शहरात महात्मा फुले चौकात एका तरुणाला अडवलं. त्यावर या तरुणाने कोरोना रुग्ण असलेल्या नातेवाईकाला काही वस्तू देण्यासाठी जात असल्याचं सांगितलं. मात्र, पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी त्याला आणखी विचारपूस केली आणि त्याच्यावर कारवाई केली.

दरम्यान तरुणाने फोन करून आमदार प्रशांत बंब यांना घटनास्थळी बोलावून घेतलं. यानंतर प्रशांत बंब त्याठिकाणी आले आणि त्यांनी पोलिसांबरोबर वाद घालत जाब विचारायला सुरुवात केली. तरूण हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णाला भेटायला जात होता, त्याला का अडवले असा सवाल प्रशांत बंब यांनी केला. अशाप्रकारे पोलीस लोकांना अडवू शकत नाही, असंही बंब म्हणाले. मात्र पोलिसांनी तरुणावर संशय आल्याने कारवाई केल्याचं स्पष्टपणे सांगितलं. त्यावरुनही बंब आणि पोलिसांत वाद झाला. संबंधित तरुण हा बंब यांचा नातेवाईक होता, अशी माहितीदेखील समोर आली आहे.

पोलीस आणि बंब यांच्यात पेटला वाद

पोलीस ऐकत नसल्यामुळे बंब याचा पारा चांगलाच चढला होता. लोक मरतायेत, व्हेंटिलेटर नाही, आक्सिजन नाही, सगळीकडे भयानक परिस्थिती आहे. तरीही पोलिस रुग्णाच्या नातेवाईकाशी असे कसे वागू शकता? असा सवाल त्यांनी केला. हा तरुण खरंच आपल्या नातेवाईकाला पाणी आणि बिस्कीट द्यायला जात आहे. तो सांगतोय, त्याच्यावर विश्वास ठेवा किंवा शहानिशा करा, असे म्हणत बंब  आक्रमक झाले.तर दुसरीकडे पोलिस अधिकारी देखील ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. बराच वेळ दोघांमध्ये वादावादी सुरु होती, तेव्हा काही प्रत्यक्षदर्शीनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. तरुणाला सोडून देण्यात आले आणि आमदार बंब देखील तिथून निघून गेले.

टॅग्स :Prashant Bambप्रशांत बंबMLAआमदारAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याSection 144जमावबंदी