रेखाचे बॉलिवूडचे स्वप्न राहिले स्वप्नच; मुलीचा उत्तर प्रदेश ते ठाणे रेल्वेप्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 08:32 AM2021-05-18T08:32:46+5:302021-05-18T08:32:59+5:30

एकीकडे कोरोना कहर सर्वत्र सुरू आहे. त्यातच, बॉलिवूडमध्ये संधी मिळेल, या आशेने उत्तर प्रदेशातील बलिया येथे राहणारी रेखा या सतरा वर्षीय मुलीने मुंबईची वाट पकडली

Rekha's dream of Bollywood remained a dream; The girl's train journey from Uttar Pradesh to Thane | रेखाचे बॉलिवूडचे स्वप्न राहिले स्वप्नच; मुलीचा उत्तर प्रदेश ते ठाणे रेल्वेप्रवास

रेखाचे बॉलिवूडचे स्वप्न राहिले स्वप्नच; मुलीचा उत्तर प्रदेश ते ठाणे रेल्वेप्रवास

Next

ठाणे : प्रत्येकालाच बॉलिवूडमध्ये नशिब आजमावावे असे वाटते. त्यातून देशाच्या काना-कोपऱ्यातून लाखो तरुण मुले-मुली मुंबईकडे धाव घेतात. त्यामध्ये काहीजणांचे स्वप्न सत्यात उतरते; तर काहींचे मुंबईत दाखल होण्यापूर्वीच भंग होते. असेच एका उत्तर प्रदेशमधील रेखा (नाव बदलेले आहे ) या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे स्वप्न मुंबईत दाखल होण्यापूर्वी भंग झाले आहे. रेखाच्या भावांनी दिलेल्या तक्रारीवरून तिला ठाण्यात रेल्वेसुरक्षा बलाच्या पथकाने फिल्मीस्टाईलने ताब्यात घेऊन सुखरूप कुटुंबियांकडे सुपूर्द केले.  

एकीकडे कोरोना कहर सर्वत्र सुरू आहे. त्यातच, बॉलिवूडमध्ये संधी मिळेल, या आशेने उत्तर प्रदेशातील बलिया येथे राहणारी रेखा या सतरा वर्षीय मुलीने मुंबईची वाट पकडली. अभिनय आणि गायनाची आवड असताना, घरातून कलागुणांना पाठिंबा मिळत नव्हता. त्यातच आपले नशीब येथे राहून बदलणार नाही, त्यासाठी मुंबईशिवाय पर्याय नाही. म्हणून मुंबईत जाण्याचा निश्चित तिने मनाशी केला आणि तिने १५ मे रोजी आपण मुंबईकडे जात असल्याची माहिती देणारी चिठ्ठी लिहून ती घरातून निघाली. मुंबईकडे येण्यासाठी महू रेल्वेस्थानकात छप्परा एक्स्प्रेस बसली. एक्स्प्रेस मुंबईकडे रवानाही झाली. आता आपले स्वप्न पूर्ण होणार म्हणून ती आंनदी होती. याचदरम्यान ती घरातून अचानक न सांगताच गायब झाल्याचे समजताच तिच्या भावाने लगेच सोशल मीडिया, पोलीस व रेल्वेच्या कंट्रोल रूमला ती पळून गेल्याबद्दल माहिती दिली. त्यानुसार सर्वत्र तिचा शोध सुरू होता. महू रेल्वेस्थानकातून मुंबईकडे निघालेल्या गाड्यांमध्ये तिचा शोध सुरू असताना ही माहिती ठाणे रेल्वे पोलिसांच्याही कानावर आली. तत्काळ ठाणे आरपीएफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी. बी. सिह यांच्या पथकाने ठाणे स्थानकात येणाऱ्या गाड्यांची कसून तपासणी सुरू केली. त्यातच रविवारी दुपा छप्परा एक्स्प्रेस ठाणे स्थानकात धडकली. तेव्हा तपासणी करताना महिलांच्या डब्यात ही मुलगी एकटीच बसली होती. 

खातरजमा करून केले पालकांच्या स्वाधीन
रेखा हिचा फोटो व अंगावरील कपडे याची माहिती आरपीएफच्या पथकाकडे होती. त्यामुळे त्या मुलीचे साधर्म्य सारखे दिसून आले. चौकशी केली असता, तिने पळून असल्याची कबुली दिल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर खातरजमा करून तिला कुटुंबियांच्या स्वाधीन केले.

 

Web Title: Rekha's dream of Bollywood remained a dream; The girl's train journey from Uttar Pradesh to Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस