संतापजनक! आजोबाकडून अल्पवयीन नातीचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 15:25 IST2019-05-01T15:11:24+5:302019-05-01T15:25:38+5:30
तळेगावची घटना : आरोपीला अटक, तालुक्यात संताप

संतापजनक! आजोबाकडून अल्पवयीन नातीचा विनयभंग
दारव्हा - पाहुणी म्हणून आलेल्या अल्पवयीन नातीचा आजोबाने विनयभंग केल्याची संतापजनक घटना मंगळवारला दारव्हा तालुक्यातील तळेगाव येथे घडली. अशोक पांडुरंग दांडेकर (५५) रा. तळेगाव असे आरोपी आजोबाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे.
पिडीत मुलगी ही अमरावती जिल्ह्यातील पुसला येथील रहिवाशी असून ती काही दिवसापूर्वी आपल्या काकूसोबत तिचे माहेर असलेल्या तळेगाव येथे आली होती. त्यावेळी तिच्यासोबत हा घृणास्पद प्रकार घडला. सुरुवातीला ती घाबरली. परंतु नंतर मात्र तिने सर्व हकीकत आपल्या कुटुंबाला कळविली. त्यानंतर तिच्या आईने थेट दारव्हा गाठून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून आरोपिविरूद्ध विनयभंग व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस करीत आहे.